रखडलेले सिंचन प्रकल्प होतील पूर्ण - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

वडूज - आघाडी शासनाने रखडविलेल्या सिंचन योजना व अन्य अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर सध्याच्या युती शासनाचा भर आहे. त्यामुळे उरमोडी, जिहे-कठापूर व इतर शेती पाणी योजनांची कामे नजीकच्या काळात तातडीने पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 
सांगितले.

वडूज - आघाडी शासनाने रखडविलेल्या सिंचन योजना व अन्य अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर सध्याच्या युती शासनाचा भर आहे. त्यामुळे उरमोडी, जिहे-कठापूर व इतर शेती पाणी योजनांची कामे नजीकच्या काळात तातडीने पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 
सांगितले.

वडूज परिसरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभानिमित्त येथील पंचरत्न मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, जितेंद्र पवार, मामूशेठ वीरकर, सदाशिव खाडे, रणधीर जाधव, हणमंतराव देशमुख, वचन शहा, अनिल माळी, मेघा पुकळे, किशोरी पाटील, अनिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

रखडलेले प्रकल्प व योजना पूर्ण करण्यासाठी राज्याने केंद्राकडून २४ हजार कोटींचा निधी उपलब्ध केला असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘‘या निधीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून दुष्काळी भागाच्या विकासाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.’’ 

डॉ. येळगावकर म्हणाले, ‘‘लोकसभा व विधानसभेला पक्ष जो कोणी उमेदवार देईल, त्यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिले जाईल.’’ अनिल देसाई यांनी झालेल्या विकासकामांची माहिती दिली.  

तालुकाध्यक्ष विकल्प शहा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विक्रमसिंह घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप शेटे यांनी आभार मानले. मेळाव्यास बाळासाहेब मासाळ, डॉ. महादेव कापसे, डॉ. उज्वल काळे, प्रा. विश्‍वंभर बाबर,  संदीप महाडिक, रमेश जाधव, डॉ. राजेंद्र खाडे, दिलीप डोईफोडे, सूरज पाटील, विलास सोमदे, चंद्रकांत घाडगे, प्रा. अजय शेटे, जयवंत पाटील, सुशील तरटे, रवींद्र खाडे, नीता घाडगे, सोनल अंबिके, स्नेहल अंबिके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: irrigation project chandrakant patil