खरे-जोशींनी गाजवली मैफल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

कोल्हापूर - जीवनात अनेकांनी काही ऐकवलेलं असतं, काही ऐकवायचं राहून गेलेलं असतं. नेमके जे राहून गेलेले असते तेच कवितेच्या माध्यमातून समोर आले तर... संदीप खरे आणि वैभव जोशी आयुष्यातील चढ-उताराचा धागा कवितांच्या माध्यमातून उलगडत होते आणि त्यास रसिकही इर्शाद, इर्शाद असा प्रतिसाद देत होते. कुठलीही चौकट नसलेल्या या कार्यक्रमात रसिकांनी मुक्त संवाद साधला.

कोल्हापूर - जीवनात अनेकांनी काही ऐकवलेलं असतं, काही ऐकवायचं राहून गेलेलं असतं. नेमके जे राहून गेलेले असते तेच कवितेच्या माध्यमातून समोर आले तर... संदीप खरे आणि वैभव जोशी आयुष्यातील चढ-उताराचा धागा कवितांच्या माध्यमातून उलगडत होते आणि त्यास रसिकही इर्शाद, इर्शाद असा प्रतिसाद देत होते. कुठलीही चौकट नसलेल्या या कार्यक्रमात रसिकांनी मुक्त संवाद साधला.

निमित्त होते, सकाळ सांस्कृतिक प्रबोधिनी आणि माई ह्युंडाई प्रस्तुत ‘गुढीपाडवा पूर्वसंध्या’ अर्थात ‘इर्शाद’ मैफलीचे. माई ह्युंडाईच्या शोरूम परिसरात काल रात्री हा कार्यक्रम रंगला. भारतीय परराष्ट्र सेवा विभागाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, माई ह्युंडाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले व माई ह्युंडाईचे सरव्यवस्थापक विशाल वडेर, कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक एलिक्‍सा पार्कचे संचालक अजयसिंह देसाई, रॉकटेक इंजिनिअर्सचे अभय देशपांडे, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर आदी या वेळी उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी ‘इर्शाद’ला साजेसे सूत्रसंचालन केले.

एरवी कुणीतरी लिहिलेल्या कविता आपल्या कानी हमखास पडतात; मात्र संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी स्वतः रचलेल्या कविता ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कवितेमागे अर्थ दडला होता. जीवनाचे तत्त्वज्ञान कविता सांगून जात होत्या. कधी हलक्‍या स्वरात तर कधी स्वरांची विशिष्ट उंची गाठून कविता सादर केल्या. ‘स्पायडरची बायको म्हणाली’ या कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पत्नीच्या पतीविषयीच्या अपेक्षा आणि त्याच्यासंबंधीची काळजी आणि प्रेम यांचे दर्शन शब्दांच्या माध्यमातून खरे यांनी घडविले. वैभव जोशी यांनी अस्सल सोलापुरी भाषेत सादर केलेल्या ‘डोह’ या कवितेवर टाळ्यांचा कडकडाट झाला. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. ऐकणाऱ्यांचे कान तृप्त झाले असताना रसिक श्रोत्यांतील कवीला साद देण्यात आली. त्या वेळी उपस्थितांपैकी काहींनी कविता सादर करून मने जिंकली.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. याचे नेमके फायदे आणि तोटे कोणते, याचे सादरीकरण वैभव जोशी यांनी केले. 

वेदनेला जात नसते...
‘वेदनेला कोणतीही जात नसते, जात आपल्या हाती नसते, तुला कोरले नसते कधीही, मलाही घाव इतके ज्ञात नसते’ ही जोशी यांची कविताही हृदयाचा ठाव घेऊन गेली. भिनणारच होते जहर तुला हे माझे, मी कवितेमधून दंश ठेवला होता, या संदीप खरे यांच्या कवितेने कार्यक्रमाची रंगत वाढविली.

Web Title: irshad maifil event