इस्लामपूर : संभाव्य पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

इस्लामपूर : संभाव्य पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज

इस्लामपूर : अचानक उद्‌भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी वाळवा तालुक्यातील महसूल प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांतर्फे त्रिस्तरीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रशासनाबरोबर ग्रामस्थांनीही याबाबत योग्य त्या उपाययोजनांची अंमलबाजवणी करण्याचे काम सुरू केल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.

वाळवा तालुक्यात पूरपट्ट्यात ३४ गावांचा समावेश आहे. त्यात इस्लामपूर विभागात बोरगाव, ताकारी, रेठरेहरणाक्ष, बिचूद, दुधारी, फारनेवाडी, गौंडवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, कासेगाव, धोतरेवाडी, बहे, तांबवे, कोळे, नरसिंहपूर, शिरटे, हुबालवाडी, खरातवाडी, चिकुर्डे, ठाणापुढे, देवर्डे, ऐतवडे खुर्द, वाळवा, जुनेखेड, नवेखेड, शिरगाव, मसुचीवाडी अशा २७ गावांचा समावेश आहे. आष्टा विभागात भरतवाडी, कणेगाव, शिगाव, मर्दवाडी, कृष्णानगर, मिरजवाडी, कारंदवाडी विभागात अशा सात गावांचा समावेश आहे.

या प्रत्येक गावात नैसर्गिक रचनेनुसार तीन टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यातत्या गावातील नदीकाठचा भाग, दुसरा टप्पा त्याच्यापेक्षा थोडा सुरक्षित भाग व तिसऱ्या टप्प्यात सुरक्षित भाग असे टप्पे आहेत. याचे नियंत्रण तहसील कार्यालयातून होणार आहे. गावपातळीवर याच्या दोन समित्या नेमल्या आहेत. गावपातळीवर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची समिती व शासकीय स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, सर्कल यांची एक समिती आहे. त्यांना महापूरसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

गावातील ज्या ठिकाणी सुरुवातीस महापुराचा जास्त धोका आहे, अशा ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करून त्यावेळच्या स्थितीवरून तत्काळ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरा व तिसरा टप्पा करण्यात आला. नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून त्या-त्या ठिकाणचे निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यानुसार पूरपट्ट्यात येणाऱ्या गावांना बचावासाठी लागणारे साहित्य इंजिनच्या बोटी, प्रत्येकाला पाण्यात बचाव करण्यासाठी किट, अत्यावश्यक म्हणून बॅटरी आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.

Web Title: Islampur Administration Ready Possible Flood Situation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top