इस्लामपुरच्या नगराध्यक्षांचे  फडणवीसांकडे मदतीसाठी साकडे 

IS320A03716_pr.jpg
IS320A03716_pr.jpg

पाटील म्हणाले, "इस्लामपुर शहराला कोरोना सारख्या विषाणुने चांगलेच विळाख्यात पकडले असुन प्रशासन व स्थानीक लोकप्रतिनिधी गेल्या आठ दिवसापासुन दिवस रात्र सतर्क राहुन शहराच्या संरक्षणासाठी कवच बनत आहेत; मात्र राज्य शासन व लोकप्रतिनिधीनी याकडे पुर्णत: कानाडोळा केल्याने प्रशासन व लोकप्रतिनीधीची ऐन संघर्षात अपुरी यंत्रणा पडु लागली आहे.

त्यामुळे शहरावरच्या संकटाला दोन हात करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शहरात नंतर मुंबई, पुणे शहराच्या कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचे केंद्र बनले आहे. गेल्या आठ दिवसापासुन प्रशासन व लोकप्रतिनिधी आपला जीव धोक्‍यात घालुन शहरात उपाययोजना करत आहेत.रुग्णांची वाढती संख्या ही शहरातील नागरीकांना जीव मुठी घेऊन राहाण्यास कारणीभुत ठरत असताना आमदार, मंत्री, खासदार व राज्यशासनाने तात्काळ दखल घेऊन शहरासाठी मदत करणे आवश्‍यक असताना पुर्णत: डोळेझाक केल्याने शहरातील नागरीकांच्यातुन नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com