
सांगली: अमली पदार्थांविरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून आज इस्लामपूरजवळील ओझर्डे ते घबकवाडी रस्त्यावरील कुंभार वस्ती परिसरातून ८ लाख ४० हजार २५० रुपयांचा २७ किलो ९२५ ग्रॅम गांजा एलसीबीच्या पथकाने जप्त केला. दरम्यान, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. सुनील रामचंद्र कुंभार (वय २८, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), सुजय बबन खोत (३४, खोत मळा, आष्टा) आणि परशुराम सिद्धलिंग पोळ (३४, पोळ गल्ली आष्टा) अशी संशयितांची नावे आहेत.