स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटना भक्कम आहे. ज्यांनी संघटनेशी गद्दारी केली त्यांची हकालपट्टी केलेली आहे. तेच लोक कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर केली. 

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटना भक्कम आहे. ज्यांनी संघटनेशी गद्दारी केली त्यांची हकालपट्टी केलेली आहे. तेच लोक कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर केली. 

शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली. त्यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. कार्यकर्त्यांवर कितीही दबाव आणला तरी स्वाभिमानी कार्यकर्ते कधीही संघटनेशी गद्दारी करणार नाहीत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,""माझे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत. ते कधीच इकडे तिकडे करणार नाहीत. ज्यांनी संघटनेशी गद्दारी केली त्यांना संघटनेतून काढून टाकले आहे. आता त्यांनी काय करायचे ते करावे. त्यांनी कोणताही पक्ष काढावा. त्याचा स्वाभिमानी संघटेवर काहीही परिणाम होणार नाही. मी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी लढत राहणार आहे. मी सत्तेचा लाचार नाही. जे लाचार आहेत त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरवली जात आहे. ज्यांनी राजीनामा दिला असे सांगितले जाते ते सर्व कार्यकर्ते आज बैठकीला उपस्थित आहेत. आमच्या पाठीमागे कोण आहे हे सोशल मीडियावरून सांगण्याची आमच्यावर अजून वेळ आलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही भासणार नाही.'' 

स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेने शेट्टी यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी साठे यांनी जाहीर केले. तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी मोरे, प्रकाश देसाई, मधुकर डिसले, राम पाटील, मकरंद करळे, आप्पासाहेब पाटील, सागर पाटील, महेश पाटील, सुरेश आवटी, तात्यासाहेब कोळेकर, रमेश हजारे, पंडित सपकाळ, नामदेव सावंत उपस्थित होते. प्रवक्ते भागवत जाधव यांनी प्रास्ताविक केले. ऍड. एस. यु. संदे यांनी आभार मानले.

Web Title: islampur news raju shetty