esakal | इस्लामपूर आता तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन 
sakal

बोलून बातमी शोधा

2Corona_25.jpg

इस्लामपूर (सांगली) : शहर उद्यापासून सलग तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 29 ते 31 मार्चदरम्यान शहरात नागरिकांना दूध, किराणा दुकान काहीही उपलब्ध असणार नाही. एक आड एक दिवस विषम तारखेला मेडीकल सुरू ठेवली जाणार आहेत. बाहेरून सुरक्षा यंत्रणा मागवून घेण्याविषयी तीन दिवसांनी पुढे काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवले जाणार आहे. शहरातील बॅंका, पतसंस्था यांनीही या तीन दिवसात व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. 

इस्लामपूर आता तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : शहर उद्यापासून सलग तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 29 ते 31 मार्चदरम्यान शहरात नागरिकांना दूध, किराणा दुकान काहीही उपलब्ध असणार नाही. एक आड एक दिवस विषम तारखेला मेडीकल सुरू ठेवली जाणार आहेत. बाहेरून सुरक्षा यंत्रणा मागवून घेण्याविषयी तीन दिवसांनी पुढे काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवले जाणार आहे. शहरातील बॅंका, पतसंस्था यांनीही या तीन दिवसात व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

नागेश पाटील म्हणाले, संभाव्य गरज ओळखून इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्यासाठी आणखी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. 4000 लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवत आहोत. दुबार करावे लागले तरीही सर्वे होईल. बफर झोनमध्ये हातावर शिक्के मारतोय, पुढील तीन महिने त्यांना बाहेर पडता येणार नाही. विषम तारखेला मेडिकल सुरू राहील. मेडिकल सुरू न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांचे परवाने रद्द करू. ठराविक क्षेत्रात बंधने लादली जातील. तहसीलदार सबनीस म्हणाले, बाहेरच्या सुरक्षा यंत्रणेची गरज नाही. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात अलर्ट राहावे. संपर्क यंत्रणा उभारावी. हेल्पलाईनशी संपर्क साधावा. कोरोना विरोधात सर्वांनी एकीने सामना करूया. प्रादुर्भाव मर्यादीत ठेवणे हेच आपले प्राधान्य राहावे.

निशिकांत पाटील म्हणाले, शहरावर मोठी आपत्ती आलीय, शहराविषयी अत्यंत वाईट चर्चा सुरुय. कोरोनाबधित लोकांच्या जवळपास 400 लोक संपर्कात आले आहेत. शहरातील साडेतीन किलोमीटर अंतरावर सील करण्यात आला आहे. 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. संजय कोरे यांनी शासनाकडून मदत मिळण्याची गरज व्यक्त केली. सर्वे करणाऱ्या आशावर्कर, अंगणवाडी सेविकाना मास्क नाहीत, औषधे नाहीत. त्यांना तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. 80 हजाराच्या लोकसंख्येच्या शहराला सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. काही लोकांमध्ये अद्याप कसलीच जाणीव नाहीय, तेच लोक बाहेर पडत असल्याचे नारायण देशमुख यांनी सांगितले. पोलिसांना फ्री हॅन्ड आहव, आमचा कसलाही आक्षेप असणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. आनंदराव पवार, संजय कोरे, विक्रम पाटील, विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, अमित ओसवाल, वैभव पवार, प्रदीप लोहार, शकील सय्यद, जयश्री माळी, सदानंद पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. 

337 जणांची यादी व्हायरल!* 
कोरोनाबधित रुग्णांच्या विविध कारणांनी संपर्कात आलेल्या 337 लोकांची यादी प्रशासनाकडूनच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्यांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे

होय! मी संपर्कात आलोय!  
करोनाबधित लोकांच्या संपर्कात आलेल्या इस्लामपूरकरांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, प्रशासनाला स्वतःहून कळवावे असे आवाहनही केले जात आहे. 

विषम तारखांना मेडीकल सुरू... 
काहीजण मेडिकल आणि दवाखाने सुरू ठेवण्यात टाळाटाळ करत आहेत, त्यांची गय की जाणार नाही, असे सांगत मेडिकल सुरूच हवीत, असा इशारा प्रांताधिकारी व नगराध्यक्षांनी दिला. 

 खासदारांची मागणी  
खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचा एक कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विशेषतः इस्लामपूर मतदारसंघात आरोग्यविषयक सुविधांसाठी खर्च करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

 सांगली, मिरजेत रिपोर्ट मिळणार! 
कोरोना चाचणीसाठी बस्वब तपासणीची व्यवस्था तूर्तास पुणे येथून सुरू आहे, मात्र आता पुण्याला जाण्याची गरज नाही, मिरज येथे दोन दिवसात व्यवस्था होणार असल्याचे नागेश पाटील यांनी सांगितले. 
 

loading image