Sangli Breaking - इस्लामपुरात खासगी बसमध्ये सापडले कोकेन; टांझानियातील एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

खाजगी ट्रॅव्हल्समधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

इस्लामपुरात खासगी बसमध्ये सापडले कोकेन; टांझानियातील एकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील (Tanzania) संशयित तरुण माकेटो जॉन झाकिया (वय २५, रा.जमोरिया मंगानो, टांझानिया ) पोलिसांनी जेरबंद केले. (Islampur) त्याच्याकडून सुमारे १० लाख ९० हजार रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. (crime case cocaine found)

हेही वाचा: सत्तर वर्षांपूर्वी कोल्हापुरात धावली होती ई-जीप!

आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित माकेटो झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्समधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Police) पोलिसांनी वाघवाडी फाटा येथे सापळा लावला. (Sangli crime news) बसची झडती घेतली असता झाकिया हा बसलेला दिसला. त्याच्या बॅमध्ये १०९ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ मिळून आला. तो मुंबईहुन बेंगलोरकडे निघाला होता. अंमली पदार्थ आणि एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Breaking News)

हेही वाचा: जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

loading image
go to top