बेकायदा भूखंडांवर चाप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

इस्लामपूरमध्ये जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाची कारवाई सुरू

इस्लामपूर - शहरातील खुल्या बेकायदा वापरात असलेल्या भूखंडांवर चाप बसणार आहे. प्राथमिक टप्प्यात पालिकेने पालिकेच्या मालकीच्या आरक्षित  जागेत लक्ष घातले. पालिकेच्या मालकीच्या जागांतील आरक्षण क्रमांक ३२, ३३ तसेच पोलिस लाईन शेजारील महादेवनगर परिसरातील दक्षिण बाजूकडील प्लॉट क्रमांक १ ते २० या पालिकेच्या मालकीच्या जागा आहेत.

इस्लामपूरमध्ये जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाची कारवाई सुरू

इस्लामपूर - शहरातील खुल्या बेकायदा वापरात असलेल्या भूखंडांवर चाप बसणार आहे. प्राथमिक टप्प्यात पालिकेने पालिकेच्या मालकीच्या आरक्षित  जागेत लक्ष घातले. पालिकेच्या मालकीच्या जागांतील आरक्षण क्रमांक ३२, ३३ तसेच पोलिस लाईन शेजारील महादेवनगर परिसरातील दक्षिण बाजूकडील प्लॉट क्रमांक १ ते २० या पालिकेच्या मालकीच्या जागा आहेत.

यातील काही जागा यापूर्वीच ९९ वर्षांच्या कराराने वाटप करून दिल्या. तर काही जागा शिल्लक आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम झालेले नाही. संबंधित  जागा ताब्यात घेण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली. ज्यांना करार करून देऊनही ज्यांनी जागा विकसित केल्या नाहीत अशांच्या जागा पालिका ताब्यात घेऊ शकते. संबंधितांनी त्या, त्या प्लॉटच्या जागांचे करारनामे किंवा मंजूर आदेश अथवा अन्य कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे तातडीने जमा करण्याची सूचना केली आहे. महिनाभराची मुदत दिली. 

शहरात अनेक खुल्या जागा आहेत. त्यांचा बेकायदा पद्धतीने वापर सुरू आहे. पालिका सभेत या विषयावर गदारोळ झाला. प्रशासनाला शिवसेनेचे नगरसेवक शकील सय्यद, वैभव पवार, अमित ओसवाल यांनी पालिका प्रशासनाला अशा किती जागा आहेत याची माहिती विचारली. तेव्हा प्रशासनाला देखील ही आकडेवारी  सांगता आली नव्हती. ही आकडेवारी अद्ययावत करून मग पुन्हा बेकायदा असल्यास त्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय या सभेत घेतला होता. त्या दृष्टीने प्रशासनाने सुरू केलेली कारवाई स्वागतार्ह असल्याचे मत नागरिक व्यक्‍त करत आहेत.

प्रशासनाच्या आडून खेळी 
पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी किंवा त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेनेने प्रशासनाच्या आडून ही खेळी केली असण्याची शक्‍यता आहे.

‘‘शासनाच्या अनेक योजनांची कामे सुरू आहेत. काही नव्या योजना येऊ घातल्या आहेत. लाभार्थींना लाभ देत असताना जागांची मर्यादा येत आहे. बेकायदा वापरातील जागा असतील तर पालिका अशांवर कारवाई करून जागा ताब्यात घेणार आहे.’’
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद

पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून अनेक भूखंड बळकावले आहेत. काही जागा केवळ नकाशावरच आहेत. प्रत्यक्षात त्याचा बेकायदा वापर सुरू आहे. प्रशासनाने या सर्व जागांची माहिती तत्काळ अद्ययावत करावी.
- शकील सय्यद, शिवसेना नगरसेवक

Web Title: islampur sangli news Arc of illegal plots