इस्लामपूर : सोयाबीनची ८०० हेक्टरवर लागवड

प्रति क्विंटलला ७ हजार ५०० रुपये मिळतोय दर; बियाणांची मागणी वाढली
सोयाबीन
सोयाबीनsakal

इस्लामपूर: तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक भाव मिळण्याच्या आशेने १०० हेक्टरवरून ८०० हेक्टरपर्यंत उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. आजरोजी सोयाबीनला प्रति क्विंटलला ७ हजार ५०० दर मिळत असल्याने आता चार रुपये शिल्लक राहणार अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

जून महिन्याच्या सुरवातीस प्रत्येक शेतकऱ्याने सर्रास सोयाबीनची लागवड केली होती. परंतु प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसाने संपूर्ण पीक वाया गेले होते. कित्येक दिवस शेतात पाणी साचून राहिले होते. मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली होती. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर कृषी विभागाने पुढाकार घेऊन १०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन लागवड केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी जिद्दीने उन्हाळी सोयाबीनची लागवड करून चांगले उत्पादन घेतले होते. त्याला १० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. त्या सोयाबीनला बियाणासाठी चांगली मागणी होती.

या वर्षीही उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे बऱ्यापैकी शेतकरी वळला आहे. या वर्षी साधारण ८०० हेक्टर सोयाबीनची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.

सोयाबीनला आज रोजी सात हजारांवर दर मिळत आहे. सोयाबीनची टंचाई असल्याने भविष्यात सोयाबीनला चांगला दर चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळी सोयाबीन निकोप असल्यामुळे त्याचा बियाणासाठी वापर होत असल्याने बाजारभावाच्या दुप्पट दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

उन्हाळी सोयाबीन पॅटर्न रुजला

फेब्रुवारी २०२१ ला वाळवा तालुक्यात १०० हेक्टर उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. यावर्षी फेब्रुवारी २०२२ ला साधारण ८०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे.

दर मिळण्याच्या आशेने उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. वेळेवर फवारणी, पाणी देत आहे. बाजारात सात हजारांच्या पुढे दर मिळत आहे. शिवाय या सोयाबीनला बियाणे म्हणून मागणी असल्याने प्रति क्विंटलला दहा हजार रुपयांच्या वर दर मिळणार आहे.

- अमोल पाटील, शेतकरी.

उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरिपा इतके होत नाही. वातावरणात बदल असल्याने त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी वातावरण थंड ठेवण्यासाठी नियमित पाण्याच्या पाळ्या, योग्य फवारणी केल्याने सोयाबीनचे उत्पादन अधिक व दरही चांगला मिळणार आहे.

- भगवान माने, कृषी अधिकारी, वाळवा तालुका, इस्लामपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com