इस्लामपूर : प्रशासकीय इमारतीसमोरील अनधिकृत बांधकाम पालिका प्रशासनाने पाडले. 

इस्लामपूर : प्रशासकीय इमारतीसमोरील अनधिकृत बांधकाम पालिका प्रशासनाने पाडले. 

इस्लामपूर - पेठ रस्त्यावर प्रशासकीय इमारतीसमोर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम आज पालिका प्रशासनाने पाडले. इस्लामपूरच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या बांधकामावरून गेले काही दिवस सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला ही कारवाई करायला भाग पाडले.

पेठ रस्त्यावरील कोमार ट्रस्ट च्या जागेवर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नामवंत असलेल्या उद्योजक कडलास्कर यांनी हे बांधकाम केले होते. सुमारे साडेचार हजार चौरसफूट आकाराचे हे काम पूर्णतः बेकायदेशीर असल्याने पालिकेने आज ही कारवाई केली. कारवाई सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी काम थांबविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र पोलीस आणि प्रशासनाने त्यांना न जुमानता कारवाई सुरूच ठेवली.

दरम्यान पटवेकर आणि महेश पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 'शहरातील सर्वच बेकायदेशीर कामे पाडा, जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे, असा आरोप पटवेकर यांनी केला. त्यावर बेकायदेशीर कामाला पाठिंबा देऊ नका, असे म्हणताच बघुयाकी तुमची हिम्मत म्हणत पटवेकर यांनी त्यांना आव्हान दिले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पटवेकर आणि समर्थकांना 'कामात अडथळा आणला तर गुन्हा दाखल करू असा इशारा दिला.

दरम्यान बांधकामाशी संबंधित काहींनी घटनास्थळी धाव घेत आम्ही स्वतःहून हे काम काढून घेतो, कारवाई थांबवावी, अशी विनंती केली. मात्र महेश पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना कारवाई सुरूच ठेवण्यास भाग पाडले.

"या कारवाईमूळे राजकीय पुढाऱ्यांची दुकानदारी संपुष्टात येईल. आमची सत्ता असेपर्यंत शहरात अनधिकृत बांधकाम कुणालाही करू देणार नाही."
- विक्रम पाटील,
पक्षप्रतोद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com