आयएसओ मानांकन ग्रामपंचायतीस गरजेचे - निनवेकर

सनी सोनावळे
शनिवार, 21 जुलै 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : या पुढील काळात आयएसओ मानांकन न मिळाल्यास विविध योजनांसाठी मिळाणाऱ्या निधीला अडथळे येणार आहेत. त्यासाठी आयएसओ मानांकन ग्रामपंचायतीस गरजेचे आहे असे मत आयएसओ प्रमुख अरूण निगवेकर यांनी व्यक्त केले.

करंदी (ता.पारनेर) येथील ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन मिळाले याबाबतचे प्रमाणपत्र (ता.18) निनवेकर यांनी सरपंच नामदेव ठाणगे यांच्यासह इतर सदस्यांना प्रदान केले. त्यावेळी आयएसओ मानांकन विषयी  निनवेकर यांनी माहीती दिली. ते म्हणाले, हे मानांकन शिक्षण, आरोग्य, महिला व 
बालकल्याण आणि प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता तसेच गावांतील सिमेंटीकरण रस्ते,पथदिवे यासंह अन्य बाबींचा अभ्यास करून दिले जाते.

सरपंच ठाणगे म्हणाले,गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून गावामध्ये वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक योजना प्रभावीपणे राबवित आहोत, याकरिता सभापती राहुल झावरे व आमदार विजय औटी यांनी गावामध्ये  निधी उपलब्ध करून देण्यासाठी भरीव मदत केली. गावातील मुख्य रस्ता असणारा करंदी घाट ते गव्हाणे शिवार हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन पुर्ण होणार आहे.
यावेळी उपसरपंच भास्कर गव्हाणे, शारदा गांगड, मंगल चौधरी, सोनाली चौधरी, मनिषा ठाणगे उपस्थित होते.

Web Title: ISO Rating is important for grampanchayat said ninawekar