प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस यावरून कोल्हापूर बाजारसमितीत खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा करावा, असे सांगत संचालक मंडळानेही मागणी फेटाळली. त्यानंतर धान्य व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या उणिवा मांडल्या तर बाजार समितीने त्याचा खुलासा केला त्यामुळे दोन्ही बाजूनी सभेत खंडाजंगी चर्चा झाली.

कोल्हापूर - "" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा करावा, असे सांगत संचालक मंडळानेही मागणी फेटाळली. त्यानंतर धान्य व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या उणिवा मांडल्या तर बाजार समितीने त्याचा खुलासा केला त्यामुळे दोन्ही बाजूनी सभेत खंडाजंगी चर्चा झाली.'' सभापती बाबासाहेब लाड अध्यक्षस्थानी होते. 

शेती उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये ही सभा झाली. सचिव मोहन सालपे यांनी मागील अहवालाचे वाचन केले. गेल्या वर्षभरात 13 कोटी 26 लाखाचे उत्पन्न बाजार समितीला मिळाले 11 कोटी रूपये खर्च झाला 1 कोटी रूपये नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रश्‍न विचारले. महादेव शिंदे, आर. वाय. पाटील, व्यापारी नयन प्रसादे, अमर क्षीरसागर, प्रसाद वळंजू, प्रदिप कापडिया, विलास साठे आदींनी विविध मुद्दे मांडले. 

सभेत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या - 

  • बाजार समितीने गुळ महोत्सव व कुस्ती मैदान भरवावे.
  • शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप सुरू करावा.
  • कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार वाढीचा फरक द्यावा. 
  • बाजार समितीने ठेवींतील पैशाचा वापर शेतकरी हितासाठी करावा. 
  • बाजार समिती स्थापन होऊन 75 वर्षे झाले तरी रस्ते झालेले नाहीत, फाटक बंद असल्याने गैरसोय होते. ही गैरसोय दूर करावी. 
  •  परवाना नुतनीकरणाचा कालावधी पाच वर्षांचा करावा. 
  • बाजार समितीने एक टक्का सेस लावला आहे तो कमी करावा. 
  • बाजार समिती आवारातील अतिक्रमणे दूर करावीत. 
  • नवीन गाळ्यांची निर्मिती करून बाजार समितीचे उत्पन्न वाढवावे.  

कावळानाक्‍याच्या पुढे अवजड वाहनांना दिवसा प्रवेश नाही, व्यापाऱ्यांची कोंडी होत आहे. पूर्वी प्रमाणे व्यवसाय होत नाही अशात प्रक्रीया केलेल्या शेतीमालावर एक टक्का सेस घेतला जातो तो चुकीचा असून तो रद्द करावा.'' 

- प्रदिप कापडिया

संचालक विलास साठे यांनी सर्व प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले की, "" बाजार समितीत रस्ते, स्वच्छतागृह, वीज अशा सुविधा आहेत कुस्ती आखाड्यात जवळपास 40 पैलवान प्रशिक्षण घेतात, कोल्डस्टोरेज संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच काम सुरू होईल, टेंबलाईवाडी धान्यबाजारात व्यापाऱ्यांना सर्व सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्थलांतरीत व्हावे जेणे करून लक्ष्मीपुरी धान्य बाजारात होणारी वाहतुकीची अडचण दूर होईल.'' 

"त्यांनी' मांडला अभिनंदन ठराव 
संचालक विलास साठे सभासदांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना दुसरे संचालक ऍड. किरण पाटील आभार मानून सभा संपवू नका असे जोर जोरात सांगत ध्वनीक्षेपकाकडे गेले. तिथे व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू यांनीही हरकत घेतली तेव्हा काही मिनिटे शाब्दीक चकमक झाली अखेर पाटील यांना बोलण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी सर्व आमदार खासदारांच्या नवीन निवडी बद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issue of Cess on processed Agri produce in Kolhapur APMC