कृष्णेसाठी चार राज्यांतील पर्यावरणवाद्यांची वज्रमूठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सांगली - वाई ते मच्छलीपट्टण असा सुमारे १२७० किलोमीटरचा चार राज्यांचा प्रवास करणाऱ्या कृष्णा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प चार राज्यांतील स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी केला आहे. कृष्णा पुनरुज्जीवन नावाने व्यासपीठ निर्माण केले केले आहे.

सांगली - वाई ते मच्छलीपट्टण असा सुमारे १२७० किलोमीटरचा चार राज्यांचा प्रवास करणाऱ्या कृष्णा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प चार राज्यांतील स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी केला आहे. कृष्णा पुनरुज्जीवन नावाने व्यासपीठ निर्माण केले केले आहे.

पर्यावरणविषयक वाढती जाणीव आणि त्यादृष्टीने उपक्रमांची सरत्या वर्षात रेलचेल होती. मात्र या प्रयत्नांसाठी सामूहिक, प्रशासकीय स्तरावर मिळणाऱ्या प्रतिसादाला मात्र मर्यादा स्पष्टपणे जाणवणाऱ्या होत्या. पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर चर्चा होते. त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र उदासीनता नेहमीचीच. तरीही सरत्या वर्षाने काही आशेचे किरण दाखवले हे आवर्जून नमूद करावे लागेल. यंदा दिवाळीत फटाक्‍यांचा ‘बसलेला’ आवाज, गणेश विसजर्नावेळी निर्माल्य संकलनास मिळालेला मोठा प्रतिसाद ही सुचिन्हे म्हणावी लागतील.  

गेल्या ३१ ऑक्‍टोबरला मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह राणा सांगलीत आले होते. पर्यावरणवादी डॉ. रवींद्र व्होरा, अजित पाटील, तेलंगणचे व्ही. प्रकाश यांच्यासह चार राज्यांचे संयुक्त व्यासपीठ स्थापन झाले. कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी चार राज्यांतील पर्यावरण तज्ज्ञ, समिती यंदा स्थापन झाली. कृष्णेच्या प्रदूषणाविरोधात आवश्‍यक सामूहिक कृती करण्यासाठी शासन, समाजाच्या सहभागातून ही समिती कृती कार्यक्रम ठरवणार आहे.

चार साडेचार वर्षांपासून अग्रणीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अग्रणीची उपनदी असलेल्या महांकालीच्या पुनरुज्जीवनास प्रारंभ झाला. छोटे बंधारे बांधणे, खोलीकरण, विहिरी-कूपनलिकांचे पुनर्भरण असे स्वरूप आहे. जलबिरादरीने या नदीचे लाभ क्षेत्र असलेल्या जत, कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या सीमेवरील गावांत ही कामे सुरू झालीत

- डॉ. रवींद्र व्होरा 

सांगलीची तीस ४० वर्षे बदनामी करणाऱ्या शेरीनाला प्रश्‍नी धुळगाव योजनेचे रडगाणे कायम राहिले. महापालिकेने एक तसूभरही ही योजना पूर्ततेसाठी प्रयत्न केले नाही. या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणुकीआधी कृष्णा नदीची बोटीतून पाहणी केली. मात्र आजही शेरीनाला कृष्णेत धो धो मिसळत आहे. सुचिन्ह इतकेच कृष्णेची चिंता वाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. डॉल्फीन नेचर ग्रुपसह विविध नदी मित्र संघटनांनी राबवलेल्या निर्माल्य संकलन व नदी स्वच्छता मोहिमेस वाढता प्रतिसाद आहे. 
 

Web Title: Issue of Krishna river Pollution