#RiverPollution पंचगंगेच्या पाण्याला हिरवट रंग

#RiverPollution पंचगंगेच्या पाण्याला हिरवट रंग

इचलकरंजी - येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा खालावली आहे. पाण्याचा प्रवाह िस्थर झाल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याला हिरवट रंग आला असून, पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

गेल्याच आठवड्यात धरणातून पंचगंगा नदीपात्रात पाणी सोडले होते. त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहत होती. मात्र काही तासांत पाण्याची पातळी एकदमच खालावली आहे. बंधाऱ्याजवळ पाणी साचले असले तरी बंधारा ते जुना पूल हा भाग पुन्हा कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. पाण्याचा प्रवाह थांबला असल्याने व त्यामध्ये सांडपाणी मिसळत असल्यामुळे पाण्याला हिरवट रंग आला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य बनत चालले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा पात्रातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासन लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून पुढील काही तासांत नदीतील पाणी उपसा बंद ठेवण्याची शक्‍यता आहे. मुळात येथून २५० व १०० अश्‍वशक्तीच्या पंपाव्दारे पाणी उपसा केले जाते. पाण्याची पातळी खालावल्याने यातील १०० अश्‍वशक्तीचा एक पंप बंद पडला आहे. पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद केल्यास कृष्णा योजनेवर अवलंबून राहावे लागणार आहे. पंचगंगा नदीतून दररोज ९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद केल्यास दररोज मोठा तुटवडा जाणवणार आहे. 

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित
जलशुद्धीकरण केंद्राचा उद्या (बुधवारी) वीजपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया ठप्प होणार आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

पुन्हा पंचगंगा प्रवािहत करण्याची गरज
पंचगंगा नदीवर इचलकरंजीसह काठावरील गावे अवलंबून आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी प्रवाही करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा दूिषत पाण्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता अधिक आहे.

पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी सध्या स्थिर झाली आहे. त्यामुळे पाण्यामध्ये शेवाळनिर्मिती झपाट्याने वाढत असल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे. दक्षता म्हणून पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत क्‍लोरीनचा जादा डोस वापरण्यात येत आहे.
- बाजीराव कांबळे,
शाखा अभियंता, इचलकरंजी नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com