पोलिस उपनिरीक्षक भरती चर्चेपुरतीच ! 

पोलिस उपनिरीक्षक भरती चर्चेपुरतीच ! 

कोल्हापूर - अथक प्रयत्नातून राज्यातील तब्बल साडेसहाशे तरुणांनी पोलिस उपनिरीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण केली. ट्रेनिंगसाठी ते आजही वेटिंगवर आहेत. दुसरीकडे पदोन्नतीच्या परीक्षेत नापास झालेले "डिपार्टमेंट'मधून हवालदाराचे पोलिस उपनिरीक्षक होतात कसे? असा आरोप आमदार करत आहेत. यामुळे नव्याने पोलिस उपनिरीक्षक होत असलेले आणि पदोन्नतीतून उपनिरीक्षक होणारे दोघेही संभ्रमावस्थेत आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल ही संभ्रमावस्था दूर करणार काय? 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले राज्यातील साडेसहाशे विद्यार्थी ट्रेनिंगच्या प्रतीक्षेत आहेत. मार्च 2019 ला त्यांचा निकाल जाहीर झाला. अनेकांना महिन्यात पुढील प्रक्रिया होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात चार महिन्यांनंतरही "मेडिकल' (वैद्यकीय तपासणी) नाही; किंबहुना पोलिस व्हेरिफिकेशन झालेले नाही. रोज दहा-बारा तास अभ्यास करून त्यांनी त्यांचे ध्येय गाठले. पोलिस उपनिरीक्षक होऊन करिअरला सुरवात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अखेर मार्च 2019 मध्ये त्यांना यश आले. मात्र, जुलै संपत आला तरीही पुढे काय होणार? याची काहीच कल्पनाही त्यांना नाही. 

सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल, आणि पुन्हा एकदा चार-पाच महिने प्रतीक्षा करावी लागेल, अशी भीती परीक्षेत यशस्वी झालेल्या तरुणांत आहे. महासंचालक "थेट' आलेल्या तरुणांना आधार देणार की "डिपार्टमेंट'च्या पदोन्नतीकडे लक्ष देणार? नेमकी वस्तुस्थिती काय आहे? ही संभ्रमावस्था महासंचालक दूर करतील काय? 

किती दिवस प्रतीक्षा? 
* पोलिस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात : मार्च 2017 
*पूर्व परीक्षा ः जून 2017 
*निकाल ः ऑगस्ट 2017 
*मुख्य परीक्षा ः ऑक्‍टोबर 2017 
*निकाल ः ऑगस्ट 2018 
*शारीरिक चाचणी ः ऑक्‍टोबर 2018 
*मुख्य निकाल ः 8 मार्च 2019 
* 16 जुलै 2019 ः आजही प्रतीक्षा अन्‌ प्रतीक्षा 

महासंचालक उत्तर देणार? 
नापास झालेले हवालदार पोलिस उपनिरीक्षक बनतात कसे? असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्याची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. चित्रफितीत ते म्हणतात, ""गृहखात्याकडून झालेले 636 आणि 1285 असे साधारण 1900 हवालदार पोलिस उपनिरीक्षक झाले तर भविष्यात 20 वर्षे एकही हवालदार पोलिस उपनिरीक्षक बनणार नाही. जे नापास झालेत त्यांनी पास होऊन हे पद घ्यावे; पण लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव ही भरती होत असल्याचे अधिकारी कसे काय सांगू शकतात? एमपीएससीचा अधिकार तो एमपीएससीचाच आहे.'' आरोपीचे संदर्भही त्यांनी चित्रफितीत दिले आहेत. साधारण 2013 आणि 2016च्या भरतीतील हे संदर्भ चर्चेत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com