ग्रामीण भागातील शिधापत्रिकांचा प्रश्न 6 ऑगस्टपर्यंत मार्गी 

शांताराम पाटील 
Wednesday, 29 July 2020

ग्रामीण भागातील शिधापत्रिकांचा प्रश्न येत्या सहा ऑगस्टपर्यंत मार्गी लावू, असे आश्वासन आज तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी येथे दिले. 

इस्लामपूर : ग्रामीण भागातील शिधापत्रिकांचा प्रश्न येत्या सहा ऑगस्टपर्यंत मार्गी लावू, असे आश्वासन आज तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी येथे दिले. 
येथे एका मेळाव्यात कागदपत्रे घेऊनही शिधापत्रिकाधारकांना वेळेत शिधापत्रिका मिळाल्या नसल्याने शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात सबनीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

वाळवा तालुक्‍यातील सर्वांना शिधापत्रिका मिळावी यासाठी 6 हजार 92 अर्ज मागवण्यात आले. त्यापैकी 322 कार्डाची पूर्तता करण्यात आली. रेशनकार्ड नवीन तयार करताना ते अचुकरित्या करावे लागते. रेशनकार्ड हे विश्वासहर्ता आहे. त्याला टिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे वेळ लागत आहे. 
ते म्हणाले.""कागदपत्रे चुकीची देणे, रेशनदुकांदाराकडून काही चुका झाल्याने साधारण 5 हजार 700 कार्डांची पूर्तता झालेली नाही. या अपुऱ्या कामासाठी 11 तलाठी व 27 रेशनदुकानदार काम करीत आहेत. 6 ऑगस्ट पर्यंत हे राहिलेले काम पूर्ण केले जाईल.'' 

काही तक्रार असेल तर नागरिकांनी नायब तहसिलदारांकडे संपर्क साधावा. पुरवठा विभागात तक्रार निवारणासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. गावातील दक्षता समितीने या रेशनदुकानदारांवर नियंत्रण ठेवावे. काही किरकोळ तक्रारी गावात सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. सबनीस यांनी केले. पुरवठा अधिकारी बाळासाहेब सौदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी बबन करे, देवकर उपस्थित होते. 

दलालांना प्रतिसाद नको 
रेशनकार्ड काढण्यासाठी कोणी दलाल पैशाची मागणी करत असल्यास त्वरित महसूल विभागाशी संपर्क साधावा. रेशन दुकानदारांनी वाहतूक विभागास पैसे देऊ नये. वजनात घट आल्यास, धान्य खराब आल्यास ते दुकानदारांनी बदलून घ्यावे, असे आवाहनही तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केले आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of ration cards will be resolved by August 6