बानूगडे पाटील म्हणाले, मतदार संघ आमचा तुम्ही का भांडताय?

बानूगडे पाटील म्हणाले, मतदार संघ आमचा तुम्ही का भांडताय?

तासगाव - तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार कुणाकडे? याबद्दल अंदाज बांधले जात असताना काल शिवसेनेच्या मेळाव्यात  नितीन बानूगडे पाटलांनी बोलताना, मतदार संघ आमचा तुम्ही का भांडताय? या मारलेल्या टोल्याची खुमासदार चर्चा आज दिवसभर सुरू आहे. 

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ सुरवातीपासून शिवसेनेकडे अपवाद गेल्या निवडणुकीचा! नंतर युती झाली सेना - भाजप एकत्र आले. लोकसभा एकत्र लढल्या. आता विधानसभा आली, मग तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघ कुणाचा ? हा वाद सुरू झाला आहे. जुन्या युतीच्या वाटपानुसार तासगाव - कवठेमहांकाळ शिवसेनेकडेच मानला जातो आहे. शिवाय शिवसेनेने त्यावर कामही सुरू केले आहे. पण वाद सुरू झाला तो लोकसभा निवडणुकीपासून !

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघाचा पुढील भाजपचा उमेदवार म्हणून अजितराव घोरपडे यांचे नाव पुढे करण्यात आले. शिवसेनेचा मतदारसंघ असताना परस्पर भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्याने शिवसेनेने दंगा सुरू केला. मुळात सेना आणि भाजपचे या मतदारसंघात सख्य किती? आणि सेनेची ताकद किती? हे जगजाहीर आहे. हा झाला एक मुद्दा ! 

खरा वाद पुढेच आहे. भाजपच्या मंत्री गोटातून अजितराव घोरपडे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच खासदार संजय पाटील यांच्या गटातून इच्छुक म्हणून ज्योतिताई पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यामुळे हा नवा दुसरा वाद सुरू झाला. आणि मग सुरू झाला तो संशयकल्लोळ ! मुळात मतदार संघ सेनेचा आणि वाद सुरू आहे भाजपमध्ये ! तोच धागा पकडून शिवसेना नेते नितीन बानूगडे पाटील यांनी काल झालेल्या सेनेच्या मेळाव्यात थेट बाण सोडला की, मतदारसंघ शिवसेनेचा आणि भांडताय तुम्ही ? आधी युती ठरू दे,  मतदारसंघ वाटप  ठरू दे, तुमच्याकडे मतदारसंघ आला तर मग तुला का मला? म्हणून भांडा की ! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com