कोल्हापूर शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा उद्या राहणार बंद 

कोल्हापूर शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा उद्या राहणार बंद 

कोल्हापूर - निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) बंद राहणार आहे. कावळा नाका टाकीची दुरुस्ती तसेच आपटेनगर येथील टाकीतील गाळ काढण्याचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा खंडित होईल.

क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, कणेरकरनगर, आपटेनगर, जिवबा नाना पार्क, रिंग रोड, सुर्वेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, तपोवन परिसर, साळोखेनगर, देवकर पाणंद, तुळजाभवानी कॉलनी, नाळे कॉलनी, संभाजीनगर बसस्थानक, संभाजीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, रायगड कॉलनी परिसर, एलआयसी कॉलनी, विजयनगर, शहाजी वसाहत,  रायगड कॉलनी, जरगनगर, आर. के. नगर, शिवाजी पेठेचा काही भाग, मंगळवार पेठ परिसर, रेसकोर्स, हॉकी स्टेडियम परिसर, वाय. पी. पोवारनगर, नेहरूनगर, आयसोलेशन परिसर, सुभाषनगर, शेंडापार्क, राजेंद्रनगर, न्यू शाहूपुरी, विचारेमाळ परिसर, कदमवाडी, जाधववाडी, लिशा हॉटेल परिसर, मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, महाडिक माळ, लोणार वसाहत, मार्केट यार्ड, राजीव गांधी वसाहत. शाहू मिल कॉलनी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, उचगाव नाका, शिवाजी उद्यमनगर, राजारामपुरी, तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल, टाकाळा खाण, माळी कॉलनी, साईक्‍स एक्‍सटेंशन, जामसांडेकर मळा, दौलतनगर, प्रतिभानगर, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. मंगळवारी (ता. १२) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com