सांगलीत पत्रा डेपोवर प्राप्तिकर विभागाचा छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सांगली : माधवनगर येथील न्यू पश्‍चिम महाराष्ट्र पत्रा डेपोवर पुणे येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा घातला. मालक सुभाष बेदमुथा यांच्या मालकीच्या या डेपोवर व निवासस्थानावर एकाच वेळी छापे घालून अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत तपासणी केली.

माधवनगर परिसरात गेल्या 15 वर्षांत नावारूपास आलेल्या न्यू पश्‍चिम महाराष्ट्र पत्रा डेपोची उलाढाल मोठी आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही येथून पत्रा जातो. बेदमुथा हे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. दुपारी एक वाजता पुणे आणि कोल्हापूर येथील प्राप्तिकर विभागाचे अधिकारी डेपोमध्ये आले. सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर काढून तपासणी सुरू केली. बेदमुथा यांच्या आलिशान बंगल्यावरही छापा घातला. छाप्याबाबत अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली होती. त्यांनी कोणतीही माहिती सांगण्यास नकार दिला.

पारदर्शक व्यवहार
छाप्याबाबत सुभाष बेदमुथा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""यापूर्वी 2014 मध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या डेपोमध्ये येऊन तपासणी केली होती. त्यानंतर आज पुणे येथील पथक आले आहे. तपासणीसाठी त्यांना सहकार्य केले आहे. आमच्या कंपनीचा व्यवहार पारदर्शक असल्यामुळे आम्हाला कोणतीच चिंता नाही.''

Web Title: it dept raids sangli patra depot