सीटीएस प्रक्रियेमुळे धनादेश वटण्यास उशीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

बारामती : बँकीग प्रणालीत धनादेश वटविण्याची सीटीएस प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत धनादेश वटण्याचा कालावधी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. देशभरातील बँकांमधून धनादेश पारित करण्याची मध्यवर्ती यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला दोन दिवसांपासून ग्रामीण भागात प्रारंभ झाला आहे. मात्र, सर्व बँकांची प्रणाली जेव्हा सुरळीतपणे सुरु होईल तेव्हाच धनादेश वेळेत पारित होऊ शकतील अशी माहिती बँकींग क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. 

ग्रामीण भागात भारतीय स्टेट बँकेमध्ये शहरातील सर्व बँकांचे प्रतिनिधी दररोज जमा होऊन धनादेश वटविण्याची प्रक्रिया पार पाडत होते. या पुढील काळात प्रत्येक धनादेश स्कॅन करुन तो सीटीएस प्रणालीवर टाकला जाणार आहे. संबंधित बँका खात्यातील रक्कम तपासून नंतर तो धनादेश पारित करणार आहे. 
यापूर्वी आदल्या दिवशी दिलेल्या धनादेशाचे सादरीकरण दुसऱ्या दिवशी केले जायचे. 
नव्या प्रणालीमध्ये दररोज संध्याकाळी बँक बंद होण्यापूर्वी आलेले धनादेश स्कॅन करुन सीटीएस प्रणालीवर टाकले जातील व ते त्वरीत पारित करण्याचा प्रयत्न संबंधित बँकांची यंत्रणा करणार आहे. या प्रणालीबाबत अद्याप बँक वर्तुळातही स्पष्टता नसल्याने पुढील काही दिवस धनादेश लवकर खात्यात जमा होईल या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 
एकट्या बारामतीपुरता विचार करायचा झाल्यास येथील 34 बँकांपैकी फक्त 12 बँकांमध्येच आजमितीस सीटीएस प्रणाली सुरळीत कार्यान्वित आहे. त्यामुळे बँकांची प्रणाली सुरळीत होईपर्यंत धनादेश पारित होण्यास कालावधी लागण्याची शक्यता आहे.
 
Web Title: It is late to adopt checks due to CTS process

टॅग्स