शेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता येत नाही. या बंधाऱ्यातून सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत भारत भालके यांनी व्यक्त केले. गेल्या चार दिवसांपूर्वी उजनी धरणातून भीमा नदीत सोलापूर साठी सोडलेल्या पाण्याने उचेठाण, बठाण, माचनुर वडापुर, अरळी, येथील बंधारे पाण्याने भरून घेतले या बंधाऱ्याची पाहणी भालके यांनी केली त्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 

यावेळी उजनी कालवा उपविभाग क्रमांक 52 चे उपविभागीय अधिकारी एस पी यादव शाखा अभियंता सिद्धेश्वर काळुंगे उपस्थित होते. यावेळी तानाजी खरात, ईश्वर गडदे, भारत बेद्रे, दत्तात्रय गडदे, सुभाष कंकाळ, राजू बेदरे, संजय बळवंतराव,  सुनील डोके, महादेव फराटे, आबासो डोके, जगदीश पाटील, विराप्पा पुजारी, ज्ञानेश्वर पुजारी, भीमराव आसबे, दयानंद सोंनगे, संतोष सोंनगे, आदी उपस्थित होते. 

माचणूर येथील बंधाऱ्याची सध्याची साठवण क्षमता कमी असल्याने येथील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ व्हावा यासाठी ज्यादा साठवण क्षमतेचा बंधारा झाला पाहिजे. तसेच बंधाऱ्यांची गळती झाली नाही पाहिजे. उचेठाण बंधाऱ्यातून मंगळवेढा शहर आंधळगाव भोसे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना साठी पाणी राखीव असल्याने येथे पूर्ण क्षमतेने बंधारा भरून घेण्याची सूचना कार्यकारी अभियंता बिराजदार यांना केली. माचनूर येथे पूल कम बंधारा होण्यासाठी केंद्रीय रस्ते व जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून या बंधाऱ्यामुळे या परिसरातील हजारो एकर शेतीला फायदा होणार आहे. शिवाय या परिसरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार असून यात बेगमपूर आणि माचनूर यांना जोडणारा पूल होणार आहे.. या पूलालाच जोडून भीमा नदीचे पाणी आड़विण्यासाठी बंधाऱ्याचे काम व्हावे यासाठी प्रयत्न करणार असेही ते म्हणाले.

Web Title: It is necessary to plan fodder cultivation with agricultural water