Loksabha 2019 : नोटा बदलण्यामागे निवडणुकीसाठी पैसे मिळवणे हा हेतू - प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar
prakash-ambedkar

मंगळवेढा - नोटा बंदीच्या काळात नोटा बदलण्यामागे निवडणुकीसाठी पैसे मिळवणे हा हेतू होता या मिळालेल्या पैशाच्या जोरावर पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पासून सावध राहण्याचे आवाहन करीत मोदी हे पंतप्रधान होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी सत्ता डोक्याने चालवायची असते पण यांनी गुडघ्यानी चालवली असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

येथील आठवडा बाजार पटांगणात घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर यावेळी अॅड आण्णाराव पाटील, अॅड अरूण जाधव, निशांत बनसोडे, अशोक माने, दशरथ कांबळे, धनाजी सरवदे माऊली हळवणकर सिध्दार्थ लोकरे, समीउल्ला खान, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अशोक माने, डि.के साखरे, प्रा. महादेव ढोणे, सुनिल शिंदे, सोमनाथ ढावरे, पंकज पाराध्ये, विक्रम शेंबडे, सिद्धार्थ लोकरे, अक्षय शेंबडे, महेश कांबळे, अंकुश शेवडे अरविंद कांबळे साजन शेंबडे, नितिन साळवे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की,  पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर 14 दिवस शांत राहून पुन्हा केलेल्या कारवाईत एकही दहशदवादी मेला नाही तरीदेखील तीनशे मारल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे सध्या देशात बदल करण्याची आवश्यकता असून, बदल एक दोन मतदारसंघात करून चालत नाही. तर ही लागलेली कीड जमीनीतील मुळासकट उखडून काढण्याची गरज आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नव्या दिशेने जाण्याची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला हमीभाव हा दरवर्षी जाहीर होतो परंतु, मिळत नाही ही शेतकऱ्यांची खंत आहे. घरावर सौरऊर्जाचे प्यानल लावून त्यातुन मिळणारी वीज शासनाला विकून बेरोजगारांना रोजगार उत्पन्न करून देता येवू शकतो. पण 109 एकर जमीनात सौर ऊर्जा प्रकल्प राबवून किती जणाना रोजगार दिला असा सवाल यावेळी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com