इटालियन पास्ताचा ट्रेंड कोल्हापूरमध्येही रुजला...!

इटालियन पास्ताचा ट्रेंड कोल्हापूरमध्येही रुजला...!

कोल्हापूर - पास्ता म्हणजे काही तरी वेगळं आहे असं वाटतं. पास्ता हा इटालीमधून कधी काळी भारतात आला. तो जसा देशाच्या अन्य भागांत रुजला, तसाच तो कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने आपला म्हणून जपला. इटालीने जगाला दिलेली ही उत्तम प्रकारची भेट. असं म्हणतात, की चीनने पास्ताचा प्रथम शोध लावला.

खरंतर हा पास्ता नुडलच्या वंशातील; मात्र इटालियन शेफनी पास्ताला अतिशय चविष्ट अन्‌ बहुमुखी खाद्य बनवलं.  इटालियन शेफनी अनेक शतकांपासून पास्ताचा स्वाद, चव वाढविण्यासाठी भरपूर अशा चविष्ठ सॉसेजीस्‌नी नटविलं. तो खाणाऱ्यांना तृप्तही केलं

आज पास्ता फक्त मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, खाऊ गल्लीतील हातगाड्यांवर मिळतोच; पण तो घरीही तयार करता येतो. अनेकांच्या घरी सकाळी नाश्‍त्यालासुद्धा हा पास्ता तयार केला जातो. तो तयार करायला सोपा आहे. एकदा का पास्ता खाल्ला, की दुपारपर्यंत अन्य जेवणाची काही गरज नाही. राजारामपुरी, शाहूपुरी, मुख्य बसस्थानक, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कावळा नाका परिसरातील जी काही हॉटेल्स्‌, रेस्टॉरंटस्‌ आहेत, तिथे हा पास्ता मिळतो. काही ठिकाणी पास्ताची खास रेस्टॉरंटस्‌ही आहेत. साधेपणा अन्‌ पौष्टिकतेमुळे तो परिपूर्ण अन्न ठरला आहे. 

पास्तामध्ये डुरम जातीच्या गव्हाचे पीठ, पाणी, मीठ, अनेकवेळा अंडेही असते. हे सर्व साहित्य एकजीव करून कणीक मळली जाते. त्यानंतर कणिकेचे वेगवेगळे आकार तयार करून नानाविध प्रकारचा पास्ता तयार होतो. अगदी मोठ्या नळ्या, शेवया, गोलाकार, शीट्‌स, पाकीट, फुलपाखरू असे आकार तयार करता येतात. पास्ताचा पूर्व आशिया, दक्षिण आशिया, पूर्व अफ्रिका, दक्षिण युरोप आणि शेवटी इटालीमध्ये प्रवास झाला. 

पास्तामध्ये विविध भाज्या, लसूण, तिखट, राईस, ऑलिव्ह ऑइल, टोमॅटो, मांस, मासे, सी फूड, चीज, क्रीम, अन्य पदार्थही असतात. इटालियन पास्ताला पास्ता एन ब्रोडो, पास्ता शुता, पास्ता अल फोरनो, पास्ताची बेक केलेली डिश, पुत्तानेस्का, पास्ता अला नॉमो, पास्ता कॉन ले सारडे, स्पेगेटी एग्लीओ, ऑलिओई पेपरानसिनो, स्पॅगेटी ऑल अरेबियता, क्‍लासिक पेन्नो अल्फ्रेडो अशी काहीशी चित्रविचित्र नावे आहेत. हे सर्व प्रकार कोल्हापूरमध्ये मिळतात.रेस्टॉरंटस्‌मध्ये गेल्यानंतर हा पास्ता खातात; पण त्याची नावे समजून घेत नाहीत. खरेतर यातून एखाद्या देशाचं फुड कल्चर समजतं. 

कोल्हापूरमध्ये ड्राय मैद्यापासून पास्ता तयार केला जातो. पास्ता तयार झाला, की त्यामध्ये अनेक सॉसेस टाकले जातात. वरणफळांप्रमाणे कणकीचे काप करून पास्ताला आकार देतात. नंतर हेच काप अगदी वरणात घालूनही खाल्ले जातात. अलीकडे प्रत्येक मॉल्समध्ये काही कंपन्यांची रेडी टू मिक्‍स्‌ अशी पास्ताची पाकिटस्‌ही मिळतात. अगदी घरीही पाकिटे आणून पास्ता तयार करता येतो.
- श्री. केतन,
सिट्रस हॉटेल्स्‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com