आयटीआयच्या मुलांसाठी खुशखबर; प्रवेशक्षमता 27 हजारांनी वाढणार

तात्या लांडगे
बुधवार, 22 मे 2019

राज्यातील आयटीआयच्या खासगी व शासकीय महाविद्यालयांची प्रवेशक्षमता एक लाख 15 हजार इतकी आहे. मात्र, दरवर्षी तब्बल अडीच ते तीनपट अर्ज प्राप्त होतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. या पार्श्‍वभूमीवर प्रवेशक्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
- चंद्रशेखर ढेकणे, सहसंचालक, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, पुणे

सोलापूर : पदविका असो की अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याइतपत वेतन अथवा पॅकेज मिळत नाही. दुसरीकडे दहावीनंतर थेट आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्‍शनच्या माध्यमातून समाधानकारक जॉब व वेतन मिळते. त्यामुळे आयटीआयकडे मुला-मुलींचा कल वाढला आहे. मात्र, प्रवेश क्षमतेच्या तुलनेत तिप्पट अर्ज आल्याने दरवर्षी तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतच नाही. या पार्श्‍वभूमीवर आता आयटीआयची प्रवेशक्षमता वाढणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सूत्रांनी दिली. 

अभियांत्रिकीचे महागडे शिक्षण सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडत नाही. दरम्यान, कुटुंबाला हातभार लागावा म्हणून कमी खर्चात अन्‌ कमी कालावधीत मुलाला नोकरी मिळावी, खूप शिकूनही सरकारी नोकरी मिळत नाही, त्यापेक्षा स्वयंरोजगार अथवा चांगल्या कंपनीत मुलगा कामाला लागावा, जेणेकरून मुलीच्या विवाहाला अथवा उदरनिर्वाहाला मदत होईल, अशी अपेक्षा पालकांना असते. प्रात्याक्षिकावर सर्वाधिक भर अन्‌ 100 टक्‍के जॉबची खात्री, कॅम्पस सिलेक्‍शनद्वारे नामवंत कंपन्यांत काम करण्याची मिळणारी संधी, यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, प्रवेशक्षमता मर्यादित असल्याने अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, या उद्देशाने प्रवेशक्षमता वाढविण्यात येणार आहे. तर सुमारे 70 खासगी आयटीआय कॉलेजला शासनाने नव्याने मान्यता दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आयटीआय महाविद्यालयांची स्थिती 
शासकीय 
417 
खासगी 
536 
प्रवेशक्षमता 
1.15 लाख 
अभ्यासक्रम 
72 
दरवर्षीचे अर्जदार 
3.50 लाख 
प्रवेशक्षमता वाढणार 
27,500 

राज्यातील आयटीआयच्या खासगी व शासकीय महाविद्यालयांची प्रवेशक्षमता एक लाख 15 हजार इतकी आहे. मात्र, दरवर्षी तब्बल अडीच ते तीनपट अर्ज प्राप्त होतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. या पार्श्‍वभूमीवर प्रवेशक्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
- चंद्रशेखर ढेकणे, सहसंचालक, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI admission increased in Maharashtra