Kulbhushan Jadhav : जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

''प्रत्येक भारतीयाची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आमचे सरकार काम करेल. जाधव यांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे ट्विटवरून स्वागत केले. ''प्रत्येक भारतीयाची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आमचे सरकार काम करेल. जाधव यांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे'', असे ट्विट त्यांनी केले. 

तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिलेल्या आदेशांचे आम्ही स्वागत करतो. सत्य आणि न्यायाचा विजय झाला असून, तथ्यांचा सखोल अभ्यास करून न्यायालयाने हा निकाल दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

प्रत्येक भारतीयाची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आमचे सरकार काम करेल. जाधव यांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jadhav will definitely get justice says Narendra Modi