कष्टाळू दिव्यांगाला "जय हिंद'ची ऊर्जा!

श्रीनिवास दुध्याल
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- तीनचाकी सायकल देऊन दिली जगण्याच्या उमेदीला सलामी

- दोन्ही पायांनी अपंग, पत्नीही अंध

- जयहिंद संस्थेने दिली तीन चाकी सायकल

सोलापूर : येथील अक्कलकोट रस्त्यावरच्या पडक्‍या झोपडीत राहून, अपंगत्वावर मात करत जिद्दीने संसाराचा गाडा हाकणारे फुलचंद जाधव यांच्या जिद्दीला जय हिंद फूड बॅंकेने तीनचाकी सायकल भेट देऊन सलामीच दिली आहे.

वयाच्या चौथ्या वर्षात तीन जागतिक विक्रम करणारा वंडरबॉय

श्री. जाधव हे मूळचे अकलूज येथील रहिवासी. कामानिमित्त गेल्या 25 वर्षांपासून सोलापूरला वास्तव्यास आहेत. ते स्वत: जन्मत: दोन्ही पायांनी अपंग असून पत्नी अंध आहे. अपत्य नाही. अपंगत्वामुळे नातेवाईकांनी नातं तोडलेलं. उदरनिर्वाहासाठी त्यांनी सोलापुरात उंदीर पकडण्याचा सापळा बनवण्याच्या कामाला सुरवात केली. शिवाय कांदे ठेवण्याची जाळी, इमारत वा घरांना दृष्ट लागू नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या काळ्या बाहुल्या विक्री करायचं काम सुरू केलं. चालता येत नसल्याने ते आपल्या झोपडीसमोरच हे सारे मांडून बसलेले असतात. त्यांच्या संसाराची व कष्टाची माहिती भूकमुक्‍त भारतासाठी कार्य करणाऱ्या जय हिंद फूड बॅंकेला मिळाली.

पेपर फुटू नये म्हणून बोर्डाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय 

"जय हिंद'चे उपाध्यक्ष प्रा. विक्रमसिंह बायस यांच्या प्रयत्नामुळे जय हिंद फूड बॅंकेमार्फत त्यांना तीनचाकी सायकल देण्यात आली, ज्याचा उपयोग त्यांची उत्पादने बाजारात नेऊन विकता येतील. या कार्यासाठी प्रा. बायस, श्रीकांत बिडवाई, मीना औरंगाबादकर, भाग्यश्री कलशेट्टी, राचप्पा कलशेट्टी, सोमशंकर कलशेट्टी, ऐश्‍वर्या कोरे, अनिकेत सरवदे, संदीप सरवदे, सुरेश सिरसुल्ला, विजय संगोळगी, अनिल मठपती यांनी सहकार्य केले.

दोन कुटुंबांतील वादातून गोळीबार 

आयुष्य वृद्धत्वाकडे झुकत असतानाही आनंदाने जगण्याची कला खरंच अशा व्यक्तींकडून शिकण्यासारखी आहे. समाजात अशा अनेक गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना स्वत:च्या कष्टाने जगण्याची इच्छा असते, मार्ग मात्र मिळत नाही. अशा व्यक्तींना संस्थेमार्फत मदत करण्याचे प्रयत्न करणार आहोत.
- प्रा. विक्रमसिंह बायस, उपाध्यक्ष, जयहिंद फूड बॅंक
-
उंदरांचे सापळे, जाळ्या आदी उत्पादने बनवून माझ्या झोपडीसमोरच विकायला बसतो. मात्र ग्राहक येत नाहीत. आता जयहिंद फूड बॅंकेने तीनचाकी सायकल दिल्याने बाजारात जाता येईल. नवीन उत्पादने बनवून बाजारात विकता येतील. या सायकलमुळे मला खूप मदत होणार आहे.
- फुलचंद जाधव, दिव्यांग कलाकार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jai-hind organisation helps disable person