जिंती रेल्वे चोरीतील चोरट्यांना अटक

तात्या लांडगे
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

सोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्‍वर-पुणे एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या दोघांना पकडण्यात आरपीएफ पोलिसांना यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील चोरांची टोळी नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर आणि गुलबर्गा या मार्गावरील रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना अनोख्या पध्दतीने लुटण्याचे काम करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पाच चोरट्यांच्या या टोळीतील दोघांना पकडले असून एकाचा शोध लागला असून उर्वरित दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्‍त जयण्णा कृपाकर यांनी दिली. 

सोलापूर रेल्वे स्थानकावरुन दररोज सुमारे 94 रेल्वे गाड्या धावतात. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर विभागातील जिंती, पारेवाडी रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांना लुटीच्या घटना मागील कित्येक वर्षांपासून सुरुच आहेत. या परिसरात रेल्वेचे आगमन होत असताना पोलिसांकडून दरवजा व खिडक्‍या बंद करण्याच्या सूचना करण्यात येतात. रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिस यासह अन्य सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था असतानाही चोरी व लुट सुरुच असल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. महिलांचे पर्स चोरणे, पाकीट मारणे, गुंगीचे औषध देऊन लूटमार असे प्रकार काही कमी झाल्याचे दिसत नाही. 

दोन वर्षातील गुन्ह्यांची स्थिती 
(2017) 
नोंद झालेले गुन्हे 
556 
गहाळ रक्‍कम 
2.74 कोटी 
(2018) 
नोंद झालेले गुन्हे 
563 
गहाळ रक्‍कम 
2.27 कोटी 

अनोख्या पध्दतीने चोरी करणाऱ्या परराज्यातील सराईत चोरट्यांच्या टोळीचा शोध लागला आहे. नागपूर, मुंबई, पुणे रेल्वे स्थानक व परिसरातील सिग्नलवर प्रवाशांना लुटल्यानंतर सोलापूरहून गुलबर्गा येथे निघालेल्या दोघांना पकडले आहे. चोरटे मूळचे हरियाणा व उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. रेल्वे चोरी रोखण्याच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थेला सूचना करण्यात आल्या असून आता नव्याने महाराष्ट्र सुरक्षा दलातील 22 पुरुष पोलिसांची मागणी करण्यात आली आहे. 
- जयण्णा कृपाकर, विभागीय सुरक्षा आयुक्‍त, रेल्वे

Web Title: Jainti railway robbery robbers arrested