... पण इतक्या सकाळी येचाल असे वाटले नव्हते (Video)

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- मॅार्निंग वॅाकला गेले आणि शपथ विधी करूनच आले
- कधी काळी ब्लॅक फ्रायडे आला होता, आता व्हाईट सॅटर्डेची होणार लवकरच घोषणा
- जादूगर अजीत (शरद) पवार यांचे भव्य जादूचे प्रयोग.... मुख्य आकर्षण - वाघाचा पोपट करून दाखवला जाईल...
- माझा तर अजून प्रातःविधी झाला नाही, अन ह्यांचा शपथविधीही झाला

सोलापूर : मी पुन्हा येईन.. मी पु्न्हा येईन.. हे एेकून होतो. मात्र इतक्या सकाळी येचाल असे वाटले नव्हते... अशा शब्दांत राज्यातील राजकीय भूकंपाबाबत नेटीझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर सोशल मिडीयांवर नेटीझन्सनी चारोळ्यांची बरसात करण्यास सुरवात केली आहे. त्यातील काही 

निवडक चारोळ्या....

- मॅार्निंग वॅाकला गेले आणि शपथ विधी करूनच आले
- कधी काळी ब्लॅक फ्रायडे आला होता, आता व्हाईट सॅटर्डेची होणार लवकरच घोषणा
- जादूगर अजीत (शरद) पवार यांचे भव्य जादूचे प्रयोग.... मुख्य आकर्षण - वाघाचा पोपट करून दाखवला जाईल...
- माझा तर अजून प्रातःविधी झाला नाही, अन ह्यांचा शपथविधीही झाला
-
सोलापुरात जल्लोष
राज्यात भाजप व राष्ट्रवादी कॅंाग्रेसचे सरकार स्थापन झाल्याने शहर व परिसरात भाजप समर्थकांनी जल्लोष केला. माजी पालकमंत्री तथा
आमदार विजय देशमुख यांनी सकाळी नागरिकांसमवेत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. महापालिकेतील माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी फटाक्यांची
आतषबाजी केली. ज्येष्ठ कार्यकर्ते राजू पाटील यांनी त्यांच्या परिसरात नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. श्री. देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर
जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jallosh of bjp party workers