भीमापात्रातील जलपर्णीने घेतला माशांचा बळी 

संजय काटे 
शनिवार, 28 एप्रिल 2018

श्रीगोंदे (नगर) : भीमापात्रात अनेक महिन्यांपासून जमलेली जलपर्णी नदीचा प्रवाह थांबल्याने सडण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र त्यामुळे अनेक माशांचा बळी गेला असून पाणीही दूषित झाल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

भीमा नदीतील बंधाऱ्याच्या फळ्या काही दिवसांपुर्वी टाकल्या. आता नव्याने सोडलेले पाणी अजून श्रीगोंदे व दौंडच्या हद्दीत आलेले नाही. मात्र पाण्याचा प्रवाह थांबला आणि जलपर्णी सडण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे सडलेल्या जलपर्णीने अनेक माशांचा बळी घेतला आहे. मरण पावलेल्या मासे नदीकाठावर पडलेले आढळले. एकीकडे जलपर्णीची दुर्गंधीने गावकरी त्रस्त झाले असून आता त्यात माशांच्या दुर्गंधीची भर पडली आहे. 

गार येथील गावकरी उमेश परकाळे म्हणाले, जलपर्णी वेळीच निकामी करण्याचा उपाय शोधला पाहिजे. अन्यथा नदीतील मासे हातीही लागणार नाही. शिवाय शेतकऱ्यांना या पाण्याचा त्रास होत असून पाण्यामुळे हाता रंग काळा पडत असल्याने लोकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

Web Title: jalparni of bheema rivers area takes life of fishes