जलपर्णी काढण्यासाठी शाहूपुरीकर एकवटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सातारा - पाण्याच्या आंदोलनांमुळे अलीकडे ओळख बनू लागलेल्या शाहूपुरी विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शाहूपुरीसह साताऱ्याच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील जलपर्णी काढण्याकामी पुढाकार घेतला. त्यांनी श्रमदान करून माहुली येथे जलपर्णी काढण्याचे काम केले. 

वर्षांनुवर्षे शाहूपुरी पुरेशा पाण्याअभावी तहानलेली राहिली आहे. कण्हेर योजना मंजूर झाली असली तरी तिचे काम आणखी किती वर्षे चालणार, हा प्रश्‍नच आहे. असमान पाणीवाटपामुळे शाहूपुरीवासीयांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाबरोबर संघर्ष सुरूच असतो. आरोप-प्रत्यारोप, आंदोलने याऐवजी कृतिशील सहभाग देऊन शाहूपुरी विकास आघाडीचे प्रमुख भारत भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनोख्या एकजुटीचे व कर्तव्य तत्परतेचे दर्शन घडविले. 

शाहूपुरीसह शहराचा पूर्व भाग व उपनगरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. प्राधिकरणाच्या कृष्णा नदीवर असणाऱ्या उपसा योजनेच्या जॅकवेलजवळील बराचसा भाग जलपर्णीने व्यापला होता. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊ नये, म्हणून श्री. भोसले यांनी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना श्रमदानाची साद घातली. सर्वांनी एकत्र येत माहुली येथे संपूर्ण परिसर जलपर्णीमुक्त केला. 

या मोहिमेत भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, प्रा. डॉ. सुजित जाधव, नितीन तरडे, पिंटू गायकवाड, जगदीश भोसले, अंकुश इथापे, महेश जांभळे, अजय भोसले, अभय भोसले, निशांत केंडे, सुमित शेटे, आशुतोष भोसले आदी सहभागी झाले होते. 

Web Title: jalparni shahupuri vikas aghadi krishna river