‘जलयुक्त’मुळे अनेक गावे झाली टॅंकरमुक्त

रूपेश कदम
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मलवडी - जलयुक्त शिवार अभियान ही जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेली महाराष्ट्र शासनाची नावीन्यपूर्ण योजना आहे. त्यामुळे जलसंधारण, जलसंवर्धन व जलसाक्षरतेबाबत महाराष्ट्रातील जनता सजग झाली. आघाडी शासनाच्या काळात जलयुक्त गाव म्हणून ही योजना सुरू झाली. त्यानंतर भाजपचे सरकार आल्यावर या योजनेला शासन निर्णय  म्हणून मान्यता मिळाली व जलयुक्त शिवार अभियान असे या योजनेस नाव देण्यात आले. 

गावागावांत पिण्यासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी उपलब्ध असणारे पाणी व आवश्‍यक असणारे पाणी यामधील तफावत भरून काढण्यासाठी विविध माध्यमातून उपाययोजना करणे व गावाला पाणीदार करणे ही या योजनेमागची मूळ संकल्पना आहे. 

केंद्राच्या व राज्याच्या जलसंधारणाच्या सर्व शासकीय योजना एकत्र करण्यात आल्या. ‘माथा ते पायथा’या तत्त्वानुसार सलग समतल चर, खोल सलग समतल चर, बांधबंदिस्ती, माती नालबांध यासोबतच सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे आदी कामे या योजनेत करण्यात आली. शासनाने या योजनेसाठी सढळ हस्ते निधी दिला. विविध कंपन्या, संस्था, वैयक्तिक लोकांनी या योजनेत तन, मन, धनाने सहभाग घेतला. पहिल्या वर्षी माणमधील २४, दुसऱ्या वर्षी ४६, तर आता ३६ गावांचा समावेश या अभियानात आहे. माणमधील पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या गावांनी एकत्रित राबविलेले चार गाव जलयुक्त शिवार अभियान राज्यासाठी आदर्श ठरले. त्यात ग्रामस्थ, मुंबईकर मंडळींनी एकत्रित उल्लेखनीय काम केले. त्यांना चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, प्रशासनाचे भरीव सहकार्य मिळाले. या अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये माणमध्ये १४९७, १६-१७ मध्ये १०२३ कामे पूर्ण झाल्यामुळे काही गावे टॅंकरमुक्त होण्यास मदत झाली तर काहींचा टॅंकरचा कालावधी कमी झाला.

जलयुक्त शिवार अभियानात प्रशासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू झाली. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ राज्यात रुजली. त्यात माण तालुका अग्रेसर ठरला.
- प्रभाकर देशमुख, माजी जलसंधारण सचिव

Web Title: jalyukta shivar village tanker free water storage