बोर्ला शिवारात तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

जामखेड (जि. नगर) - बनावट सोनेखरेदीच्या वादातून जामखेड-करमाळा रस्त्यालगत बोर्ला शिवारात तिघांनी आज दुपारी दोन भावांना बेदम मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला. जामखेड पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. डॉ. श्रीकृष्ण हलदार (वय 35, रा. लातूर) असे मृताचे नाव आहे.

लातूर येथील डॉ. श्रीकृष्ण व त्याचा मोठा भाऊ मनोरंजन हलदार (वय 38) यांना अज्ञात तिघांनी कमी पैशात सोनेखरेदीचे आमिष दाखविले. त्यासाठी बोर्ला शिवारातील एका हायस्कूलमागे सकाळी साडेदहाच्या सुमारास बोलावले. तेथे हलदार बंधूंची एका महिलेसह तिघांसोबत भेट झाली. ठरल्याप्रमाणे सोन्याचा व्यवहार झाला. हलदार बंधूंनी आरोपींना तीन लाख रुपये देऊन सोनेखरेदी केली. मात्र, हे सोने बनावट असल्याचे हलदार बंधूंच्या लक्षात आले.

Web Title: jamkhed naagar news youth murder