‘आयटक’चे कार्यकर्ते शेख यांचा अपघाती मृत्यू

‘आयटक’चे कार्यकर्ते  शेख यांचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर -‘आयटक’ कार्यकर्ते जमीर खुतबुद्दीन शेख (वय ४२, रा. अकबर मोहल्ला, सोमवार पेठ) यांचा मंगळवारी (ता. १) मध्यरात्री केर्ली येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुले असा परिवार आहे. अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.

शेख मोटारीतून पन्हाळ्यावरून कोल्हापूरला येत होते. इर्षाद बाबुसा नदाफ (३५, जवाहरनगर), यासर सादिक फरास (२८, रा. बाराईमाम तालमीजवळ), सलाम महम्मदकरीम शिकलगार, अब्दुल इब्राहिम इराणी (२४, कारंडे मळा), इजाज यासिन मुलाणी (२८, रा. शाहूपुरी, दुसरी गल्ली), उमेश पवार (हातकणंगले) हेही त्यांच्यासोबत होते. केर्लीजवळ पहाटे मोटार चिंचेच्या झाडावर आदळली. यावेळी १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. शेख बेशुद्ध 
अवस्थेत होते. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.

स्मृतिदिनाचा कार्यक्रम राहून गेला
दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे शेख स्वीय सचिव होते. ते आयटकचे कार्यकर्तेही होते. बुधवारी (ता. ३) शेख यांनी अविनाश पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com