जनता दलातर्फे सांगलीत आणीबाणी दिनाचा निषेध 

janata dal.jpg
janata dal.jpg

सांगली-  देशातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केली होती. जनता दल (सेक्‍युलर) तर्फे या आणीबाणी दिनाचा आज स्टेशन चौकात निषेध करण्यात आला. तसेच माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. 

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केली. त्यावेळी ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते व कार्यकर्ते यांना तुरूंगात टाकण्यात आले. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेले. आणीबाणीचा काळ देशाच्या इतिहासात एक काळे पर्व ठरले. तसेच लोकशाहीवर गदा आणली गेली. त्यामुळे आणीबाणीचा निषेध करण्यासाठी जनता दल (सेक्‍युलर) तर्फे आज स्टेशन चौकात आंदोलन आयोजित केले होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. 

तसेच 25 जून हा माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचा जन्मदिन आहे. त्यांनी मंडल आयोग लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यामुळे देशातील बहुजन, ओबीसींना न्याय मिळाला. तसेच विकासाचे नवे पर्व सुरू झाले. त्यामुळे त्यांनाही आज अभिवादन करण्यात आले. माजी आमदार प्रा. शरद पाटील, ऍड. के.डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, डॉ.श्रीपाल चौगुले, ऍड. फय्याज झारी, जनार्दन गोंधळी, राजेंद्र कोलप, रामचंद्र माळी, कृष्णा लाड, श्रीकांत भोकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com