पोलिस अधिक्षकांचा जनता दरबार

पोलिस अधिक्षकांचा जनता दरबार

मोहोळ : जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी (ता. 20) जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यात वेगवेगळ्या पंधरा तक्रारीचे निवारण करण्यात आले. पाटील हे सोलापुर येथे बदली होऊन आल्यापासून अशा प्रकारचा जनता दरबार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत होण्याची ही पहीलीच वेळ आहे.

अधिक्षक आल्याचे समजताच मोठी गर्दी झाली. त्यात अनेक सामाजीक संघटनांनी पाटील यांचा सत्कार केला. पाटील यांच्यासमोर अनेक नागरीकांनी आपापल्या लेखी व तोंडी तक्रारी केल्या त्यांचे पाटील यांनी निराकरण केले, त्यात घरगुती जागा, जमिन, तसेच घरगुती अडचणीचा समावेश होता. शहरातील नागरीकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा कन्या प्रशाला चौकातील भुयारी मार्गाची समस्या मांडुन त्याचे गांभीर्य समजावुन सांगीतले त्यावर अधीक्षक पाटील यांनी सोलापूरला जाताना चौकात थांबुन कांही पत्रकारा समवेत पाहणी केली. 

तसेच महामार्ग आधिकाऱ्याला भ्रमणध्वनीवरून सूचना दिल्या. पोलिसांनीही आपल्या तक्रारी अधिक्षक यांच्याकडे केल्या, त्यात व्हॉटस्अॅपवरुन खोटया तक्रारी दिल्या जात असल्याच्या मुद्दयाकडे लक्ष वेधले. त्यावर तुम्ही तुमच्या कामात एकनिष्ठ राहा, पारदर्शक कारभार करा, अशा सुचना दिल्या. पोलिस ठाण्याचा कारभार पाहुन पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सर्व अधिकारी पोलिस कर्मचारी उपस्थीत होते. पाटील यांनी तब्बल तीन तास जनता दरबारासाठी वेळ दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com