बॅंक ऑफ इंडियाच्या 'जनधन'मध्ये 83 कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

सोलापूर - चलनातून हजार व पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर देशातील जनधन योजनेच्या खात्यांत कोट्यवधीची माया जमली आहे. बॅंक ऑफ इंडियाच्या सोलापूर विभागात येणाऱ्या सात जिल्ह्यांतील 85 शाखांमध्ये जनधन योजनेची तीन लाख 934 खाती आहेत. यापैकी पन्नास हजार खात्यांमध्ये एकही रुपया जमा झालेला नाही, तर उर्वरित खात्यांमध्ये 83 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार यांनी दिली.

बॅंक ऑफ इंडियाच्या सोलापूर विभागांतर्गत सोलापूरसह मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड व वाशीम हे जिल्हे येतात. या सात जिल्ह्यांमधील 85 शाखा, विदर्भ- कोकण बॅंकेच्या 35 शाखा व बॅंक ऑफ इंडियामध्ये खाती असलेल्या इतर नागरी सहकारी बॅंकांसाठी रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने आतापर्यंत फक्त 86 कोटी रुपयांचा चलनपुरवठा झाला आहे. बॅंकांच्या व ग्राहकांच्या तुलनेत मिळालेले चलन अपुरे असून, चलन तुटवड्याचा प्रश्‍न आम्हालाही भेडसावत असल्याचे भावसार यांनी सांगितले.

Web Title: jandhan scheme, eighty three crore rupees in bank of india