सोलापूर : मारहाणप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन

दावल इनामदार
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नंदुर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे यास मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड व पाच पोलिस कर्मचारी यांना त्वरित निलंबित करावे यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

ब्रह्मपुरी (सोलापुर)  : नंदुर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे यास मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड व पाच पोलिस कर्मचारी यांना त्वरित निलंबित करावे यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

नंदुर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे यांचा गावात घडलेल्या घटनेशी काडीमात्र संबंध नसताना व दुकानाकडे जात असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड व त्यांच्यासोबत असलेल्या पाच कर्मचारी यांनी सर्जेराव गाडे यांना अडवून कसलीही विचारपूस न करता काठ्यांनी व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणार्‍या पोलिसांच्या तोंडाचा दारूचा वास येत होता. 

गाडे यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचे नातेवाईकांसह मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता सहाय्यक पोलिस निरीक्षक मारकड यांच्या सांगण्यावरून त्यावेळी ठाणे अंमलदार यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर  गाडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

गाडे यांना मारहाण होऊन दोन महिने झाले तरी अजूनही संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही व निलंबित केले नाही. याबाबतचे निवेदन मंगळवेढा पोलिस स्टेशन, व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, जिल्हाधिकारी यांना दिले असून, कसलीही कारवाई केली नाही. यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर 15 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, सर्जेराव गाडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हभाळे, रघु चव्हाण, दामाजी मोरे, पप्पू दत्तू ,बलभीम माळी, बिरुदेव ढेकळे, बाळासाहेब नागणे, सुखदेव डोरले, गजानन जाधव, असिफ तांबोळी, अमोल माळी, अशोक कांबळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janhit shetkari sanghatana strike for aginst police in solapur district