Jat Crime : चारित्र्याच्या संशयावरून मायलेकींचा गळा दाबून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

अनैतिक संबंध व चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व चौदा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Priyanka Belunkhe and Mohini Belunkhe
Priyanka Belunkhe and Mohini BelunkheSakal
Summary

अनैतिक संबंध व चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व चौदा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

जत - कुणीकोणूर (ता. जत) येथे अनैतिक संबंध व चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व चौदा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रियांका बिरुदेव बेळुंखे (वय २५) व मुलगी मोहिनी बिरुदेव बेळुंखे (वय १४) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. रविवारी (ता. २३) नऊपूर्वी कुणीकोणूर ते सनमडी रस्त्यावर असलेल्या बेळुंखे वस्ती येथे धक्कादायक घटना घडली. जत तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली.

याप्रकरणी पोलिसांनी पती बिरुदेव ऊर्फ बिराप्पा नाना बेळुंखे (३६, बेळुंखे वस्ती, कोणीकोणूर, ता. जत) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृत प्रियांकाच्या माहेरील संतोष रामा चौगुले (वय १९, खैराव, ता. जत) याने फिर्याद दिली. जतच्या प्रभारी उपअधीक्षक अश्विनी शेंडगे व उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणेला तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी माहिती दिली, की कुणीकोणूर ते सनमडी रस्त्यावर असलेल्या बेळुंखे वस्ती येथे बिराप्पा बेळुंखे व पत्नी प्रियांका, मोठी मुलगी मोहिनी, लहान मुलगी व दोन लहान मुले असे राहण्यास होते. बिराप्पा शेती करतात. काही दिवसांपासून त्यांचा पत्नीशी वाद सुरू होता. त्यांचे भावकीतही फारसे पटत नव्हते.

रविवारी सायंकाळी पती-पत्नीत जोराचा वाद झाल्याची चर्चा होती. रागात त्याने प्रियांकाचा दोरी अथवा ओढणीने गळा आवळून खून केला. पोटची मुलगी मोहिनीचादेखील गळा दाबून खून केला. दोघांचाही मृतदेह त्यांच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या झोपडीत आढळला.

रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले होते. सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मृतदेह घेण्यास नकार

चारित्र्याच्या संशयावरून पती बिरुदेव ऊर्फ बिराप्पा याने प्रियांका व मुलगी मोहिनीचा गळा दाबून खून केला. त्याने मारहाण, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करा यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी संशयित बिराप्पा बेळुंखे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक केल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com