छोटे मासे गळाला, मोठे मासे सुसाटच 

छोटे मासे गळाला, मोठे मासे सुसाटच 

सांगली - जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून मनरेगाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या निधी खर्च झाला त्यातील प्रत्यक्ष जागेवर किती कामे झाली याचा शोध घेतला तर पन्नास टक्केही प्रमाण सापडणार नाही. जत तालुक्‍यातील तीन गावांतील घोटाळ्याबद्दल 11 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई एक हिमनगाचे टोक आहे. यातील छोट्या माशांवर कारवाई होते, बडे मासे मात्र मोकाटच सुटलेले आहेत. मनरेगा कामांवर देखरेखीची प्रमुख जबाबदारी रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांची आहे. झेडपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनरेगातून कामे होतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय यातील एकही पान हलत नाही. 

जत तालुक्‍यातील बाज, कासलिंगवाडी आणि एकुंडी येथे मनरेगातील गैरव्यवहार प्रकरणांतील 11 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बडतर्फ केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यातील घोटाळाप्रकरणी तक्रार झालेल्या अर्जांची संख्या ही किमान 3 हजारांवर आहे. त्यांची वेळीच दखल घेतली असती तर अधिकाऱ्यांवर जरब बसली असती. रोहयोच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी सुचेता भिकाणे यांच्याकाळात सर्वाधिक तक्रारी जिल्ह्यातून झाल्या. त्यांनी सातत्याने रोहयोतील घोटाळेबाजावर कारवाईचे इशारे दिले, प्रत्यक्षात मात्र कारवाई केव्हाच करण्याचे धाडस दाखवले नाही. रोहयो कामांना भेटीतून त्यांनी संबंधित यंत्रणांना अभय दिले. यामुळे तक्रारदार नागरिकही हतबल झाल्याचे चित्र होते. अनेक गैरकारभार करणाऱ्यांकडून "हलवून खुंठा जाम' म्हणतात ना त्यांचा अनुभव आला. 

जिल्ह्यात मनरेगाची सर्वाधिक कामे जत आणि आटपाडी तालुक्‍यात झाली. जत तालुक्‍यात सर्वाधिक चांगल्या कामाबद्दल राज्यपालांच्या हस्ते सीईओ डॉ. राजेंद्र भोसले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी पुरस्कारही स्वीकारला. त्याच वेळी येथील यंत्रणाबद्दल चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या काहीतरी गडबड आहे हे लक्षात येणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झालेच नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडील तक्रारीपेक्षा झेडपीकडून मोठ्या संख्येने कामे झाल्यांमुळे तक्रारींचा ओघ साहजिकच जास्त राहिला. तरीही त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले. सीईओ डॉ. भोसले यांनी तीन गावांतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. तिच्याकडून चौकशी सुरूच आहे. 
जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून काढलेल्या विहिरींची संख्या मोठी आहे. खंडोबाचीवाडी (ता. पलूस) सारख्या एकाच गावात सन 2012-13 वर्षात 28 विहिरी खोदल्या. त्या आता गायब झाल्यात. बागायती पट्ट्यात एवढ्या विहिरींसाठी कोण पुढे आले हा प्रश्‍न आहे. जुन्या विहिरींना अनुदान दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पुढे मात्र हे प्रकरण गुंडाळण्यात आले. 
 

बोगस कामांवर निधी गंभीर... 

सध्याच्या चौकशीत कामे झाली हे ठिकण, पण कामेच न करता निधीची उचल अतिशय गंभीर आहे. म्हणे अनेकांनी गट बदलून कामे केली. मग तुम्ही काय करीत होता. गट बदलला म्हणजे कामेच झालेली नाहीत हे अधिकारी मान्य करायला तयात नाहीत. ही अनियमितता नव्हे हा सरळ-सरळ गैरव्यवहार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com