जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत मोहोळच्या विद्यार्थ्यांचे यश

राजकुमार शहा 
शुक्रवार, 20 जुलै 2018

मोहोळ - एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पापरी ता मोहोळ शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये तीन विद्यार्थाची निवड झाली आहे ते खालीलप्रमाणे
१ ) उत्कर्षा चंद्रकांत थोरात
२ ) प्रणव शांतीलाल सुतार
३ ) प्रथमेश शहाजी चंदनशिवे

लोकसंख्येनुसार मोहोळ तालुक्याला चार जागा असून, त्यापैकी तीन जागा पापरी शाळेने पटकाविल्या आहेत. यशस्वीतांना सिताराम गवळी, मानाजी थोरात, भास्कर थोरात, दत्तात्रय डोके या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतांचा सत्कार कोन्हेरी केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर खुणे यांनी केला. यावेळी पापरी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी
अनगर बिटचे विस्ताराधिकारी विकास यादव मोहोळचे गट शिक्षणाधिकारी मारूती फडके ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष समाधान भोसले उपाध्यक्ष रमेश टेकळे व पापरी ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
 
Web Title: Jawahar Navodaya Admissions Test: The success of Mohall students