जयकुमार गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; चर्चाच चर्चा

jaykumar gore
jaykumar gore

सातारा : अखेरच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या मतमाेजणीत जयकुमार गोरे यांनी 3043 मतांनी बाजी मारत एकवटलेल्या विरोधकांना माण मतदारसंघात अस्मान दाखविले. तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत ऐतिहासिक हॅटट्रिक साधण्याची किमया साधणाऱया आमदार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हाेते. 

माण, खटाव मतदारसंघांत भाजपचे जयकुमार गोरे, सर्वपक्षीय टीमचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यात तिरंगी लढत झाली. यंदाच्या निवडणुकीत मनी, मसल पॉवरचा वारेमाप वापर करण्यात आला होता. जातीय राजकारणाचा हुकमी एक्काही शेवटच्या टप्प्यात बाहेर काढण्यात आला होता. निवडणूक जिंकण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून जयकुमार गोरेंनी आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत राखली. या उत्कंठावर्धक ठरलेल्या लढतीत जयकुमार गोरेंनी 3043 मतांनी बाजी मारली. यामध्ये जयकुमार गोरे (भाजप) 91469, प्रभाकर देशमुख (अपक्ष) - 88426, शेखर गोरे (शिवसेना)  37539 यांना मते मिळाली आहेत. 

लोकसभेच्या निवडणुकीत माढा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार करण्यात आमदार जयकुमार गाेरेंचा म्हत्वपुर्ण वाटा ठरला आहे. विधानसभा निवडणूकीत पश्‍चिम महाराष्ट्रात साताऱ्यात पहिल्यांदाच भाजप शिवसेनेला उत्तम यश मिळाले आहे. हे यश साजरे करताना जिल्ह्याच्या पदरात फुल ना फुलाची पाकळी पडणार हे अपेक्षित आहे. त्याला कारणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात दिलेला शब्द आहे. 

म्हसवडच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरेंना विजयी करा, त्यांना मंत्रिपद देतो, असे जाहीर वचन माणच्या जनतेला दिले होते. मुख्यमंत्र्यांचे ते म्हणणे जनतेने ऐकले. आता मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा शब्द कसा पाळतात हे पाहायची वेळ आहे,

जयकुमार गाेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयत्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकी संदर्भात चर्चा केली. तसेच गाेरेंनी मुख्यमंत्री यांना सरकार स्थापनेस व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान गाेरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीची समाजमाध्यमांवर चर्चाच चर्चा सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com