इस्लामपुरात जयंत पाटीलना धक्का; पलूस, विट्यात कॉंग्रेसची सरशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूरात राष्ट्रवादीची विरोधी विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. निकालाचा हा कल माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आमदार जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का समजला जातो. 

तासगावात राष्ट्रवादी व भाजपमध्ये काट्याची टक्कर सुरू असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ऍड. संजय सावंत आघाडीवर आहेत. 

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूरात राष्ट्रवादीची विरोधी विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. निकालाचा हा कल माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आमदार जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का समजला जातो. 

तासगावात राष्ट्रवादी व भाजपमध्ये काट्याची टक्कर सुरू असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ऍड. संजय सावंत आघाडीवर आहेत. 

विट्यात कॉंग्रेस आघाडीवर असून सत्ता राखण्यात त्यांना यश आल्याचे स्थिती आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या स्नूषा प्रतिभा पाटील नगराध्यक्षपदी आघाडीवर आहेत. तेथे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या स्नूषा शीतल बाबर पिछाडीवर आहेत. 

आष्ट्यात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सत्ता राखण्याकडे कूच केली आहे. मात्र येथे विद्यमान नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे या नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. या त्यांचे पती व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांना धक्का मानला जातो. 

कवठेमहांकाळला आमदार सुमनताई पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी आघाडीने विजय मिळवत खासदार संजय पाटील यांच्या गटाला धक्का दिला आहे. खानापूर नगपंचायतीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या युतीने सत्ता मिळवली आहे. तर कडेगाव नगरपंचायतीत आमदार पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने वर्चस्व राखले आहे. 

निकाल हायलाईटस 
* कवठे महांकाळ : नगरपंचायत ( राष्ट्रवादी कॉंग्रेस, अजितराव घोरपडे) स्वाभिमानी विकास आघाडी -12, ( भाजप) परिवर्तन आघाडी - 4 , अपक्ष 1 
* पलूस : नगराध्यक्ष कॉंग्रेसचे राजाराम सदामते विजयी पालिका कॉंग्रेस-12 स्वाभिमानी 4 
* कडेगाव : कॉंग्रेस-10 भाजप -7 
* खानापूर : कॉंग्रेस सुहास शिंदे -8 शिवसेना बाबर - 3 राजेंद्र माने गट-4 
* इस्लामपूर : जागा -28 विकास आघाडी -13 नगराध्यक्षपदी विकास आघाडीचे निशिकांत पाटील 3500 मतांनी आघाडवर 
* तासगाव - राष्ट्रवादी -6, भाजप -6 नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ऍड. सावंत आघाडीवर 
* विटा - कॉंग्रेस -10, शिवसेना -1, नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या प्रतिभा पाटील. सत्ता राखण्यात काँग्रेसला यश.    
* आष्टा - शिंदे राष्ट्रवादी गट-16, अपक्ष -2 विरोधी आघाडी-3 नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्नेहा माळी विजयी ( *विद्यमान नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे पराभूत)

Web Title: Jayanat Patil lose in Islampur