हल्लाबोल सभा जंगी करा : आमदार जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सांगली : राष्ट्रवादीच्या वतीने चार आणि पाच एप्रिलला होणाऱ्या हल्लाबोल आंदोलन सभेला विक्रमी गर्दी जमवून यशस्वी करण्याचा निर्धार आज बैठकीत करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली आणि मिरजेतील सभा जंगी करा असे आवाहन ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी केले. 

सांगली : राष्ट्रवादीच्या वतीने चार आणि पाच एप्रिलला होणाऱ्या हल्लाबोल आंदोलन सभेला विक्रमी गर्दी जमवून यशस्वी करण्याचा निर्धार आज बैठकीत करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली आणि मिरजेतील सभा जंगी करा असे आवाहन ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी केले. 

जिल्हा परिषदेसमोरील राष्ट्रवादी भवनमध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाली. आमदार जयंत पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते. यावेळी जमलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या आयोजनाबाबत मते व्यक्त केली. आमदार जयंत पाटील यांनी त्यांना जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. 

आमदार पाटील म्हणाले, "" महापालिका निवडणुकीवेळी गर्दी जमवण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे सांगली, मिरजेतील सभा जंगी यशस्वी करा. त्यासाठी मोठी गर्दी जमवा. सांगलीत होणाऱ्या सभेला सांगली विधानसभा मतदार संघातील तर मिरजेत होणाऱ्या सभेला मिरज विधानसभा मतदार संघातील लोक येतील. त्यासाठी गावोगावी संपर्क करा. सांगली आणि मिरजेत चार एप्रिलला सायंकाळी सभा होणार आहेत.'' 

जिल्ह्यात सात ठिकाणी सभा होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी सर्वांनी कामाला लागावे. सर्व सभांना मोठी गर्दी करुन सभा यशस्वी करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी पद्माकर जगदाळे, राहुल पवार, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. 

मिरज तालुक्‍यातील युवकचे अध्यक्षाने बुथ कमिट्या निवडीत वरिष्ट नेत्यांचा हस्तक्षेप होत आहे, त्यामुळे बुथ कमिट्या नेमण्यात अडचणी येत असल्याची तक्रार थेट आमदार पाटील यांच्याकडे केली. यावर नाराजी व्यक्त करीत राजकारणात अडचणी येत असतात. 
युवक राष्ट्रवादीचे इव्हेंट मॅनेजमेट नव्हे, तर नियोजन हवे. गावात फलक लावून फोटो फेसबुकवर लोड करणारे नको आहे. मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले.

बैठकीला अरुण लाड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक बी. के. पाटील, मनोज शिंदे, ताजुद्दिन तांबोळी, युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, जिल्हा परिषदेतील गटनेते शरद लाड, ऍड बाबासाहेब मुळीक, किसन जानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Jayant Patil calls for strong preparation for Halla Bol yatra