मोदींच्या भीतीने शिवस्मारकाची उंची कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कोल्हापूर - गुजरातमधील सरदार पटेल यांच्या स्मारकाची उंची कमी वाटू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी केली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची भव्यता दर्शवणारे शिवस्मारक उभे राहावे, हीच इच्छा आहे. राज्य सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचे जाहीर केले असून, त्याचा आराखडाही तयार आहे. मात्र, गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची कमी वाटू नये म्हणून शिवस्मारकाची उंची मुख्यमंत्र्यांनी कमी केली. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेवरूनच त्यांनी हे केले. सरदार पटेलांबद्दल आदर आहेच; पण त्यांच्या पुतळ्याच्या भव्यतेसाठी शिवस्मारकाची उंची कमी करणे योग्य नाही. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर भव्य शिवस्मारकाची निर्मिती करू.’’

Web Title: Jayant Patil Comment