नगरमधील राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

सांगली - नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केलेल्या नगरसेवकांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश दिले असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

सांगली - नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केलेल्या नगरसेवकांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश दिले असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

कोतवाल संघटनेचे आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या आंदोलनस्थळी श्री पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोतवालांच्या पाठीशी राष्ट्रवादी असल्याचे त्यांनी सांगितले. 

नगरच्या बंडखोर नगरसेवकाकडून नोटीसीला उत्तर आल्यानंतर संबंधित नगरसेवकावर राष्ट्रवादी पक्ष कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

श्री पाटील म्हणाले, भाजप आणि शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा द्यायचा नाही अशी भूमिका आमची आहे.  त्याचबरोबर जर भाजप आणि शिवसेनेला अंतर्गत कोणी मदत करत असेल तर ते घातक आहे. त्यांना पक्षामध्ये थारा देणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत कोणाशी युतीबाबत चर्चा सुरू आहे यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री पाटील म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. चर्चेच्या काही बैठका यापूर्वी त्यांच्यासोबत झाल्या आहेत. पुन्हा 31 रोजी बैठक आयोजित केली आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष भाजप, शिवसेनेच्या विरोधात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Jayant Patil comment