स्वतंत्र बाणा सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती

स्वतंत्र बाणा सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती

इस्लामपूर - स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून शिवसेनेने सत्तेसाठी भाजपशी युती केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे केला.

आमदार पाटील हे अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत भारतीय प्रश्नांवर व्याख्यानासाठी गेले आहेत. तेथून त्यांनी ट्विट करीत शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार केला.

श्री. पाटील यांनी मोदी सरकार व भाजपच्या चार वर्षांतील वाटचालीवर जहरी टीका केली. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’च्या संपादकीयमधून मोदी सरकार व भाजपची लक्तरे काढली आहेत. शिवसेनेने मोदी सरकारची तुलना ‘जुलमी ब्रििटश राजवटी’शी करून सरकारला झोपाळू ‘कुंभकर्ण’ची उपमा दिली. 
श्री. पाटील यांनी म्हटले आहे, की काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करण्यापर्यंत शिवसेनेने मजल मारली. राज्य, देशातील जनतेने ते पाहिले, ऐकले युती गेली खड्ड्यात. आधी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचे बोला, भाजपच्या राजवटीतील महागाईने सामान्य जनता होरपळून गेली, भाजपची नोटबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा कट, पहले मंदिर फिर सरकार, ‘गुजरात मॉडेल’ म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट अशी टीका करीत भाजपच्या  गुजरातमधील काठावरील विजयावर, चार राज्यांतील पराभवावर तुटून पडत युवानेता हार्दिक पटेलचे कौतुक करणारी शिवसेना कशी बदलली ? उद्धवजींनी दिलेल्या ‘स्वबळा’च्या नाऱ्याचे काय झाले? चार वर्षांत मोदी सरकार व भाजपाविरोधी घेतलेली भूमिका शिवसेना विसरली काय? की हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता? असे सवाल ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com