विशाल यांच्या माफीनाम्यानंतर जयंतराव म्हणाले,"जिंकण्यासाठी लढा' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

सांगली - वसंतदादा - राजारामबापूचा वाद लोकहितासाठी होता. परक्‍यांनी आपल्या जिल्ह्याचे निर्णय करु नयेत यासाठी होता. वसंतदादांनी मला राजकारणात आशिर्वाद दिला. विष्णूअण्णांनी माझ्यावर प्रेम केले. आता पुढे बघून राजकारण करा. जिंकण्यासाठी लढा, असा वडिलकीचा सल्ला आणि आशिर्वाद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे दिले.

सांगली - वसंतदादा - राजारामबापूचा वाद लोकहितासाठी होता. परक्‍यांनी आपल्या जिल्ह्याचे निर्णय करु नयेत यासाठी होता. वसंतदादांनी मला राजकारणात आशिर्वाद दिला. विष्णूअण्णांनी माझ्यावर प्रेम केले. आता पुढे बघून राजकारण करा. जिंकण्यासाठी लढा, असा वडिलकीचा सल्ला आणि आशिर्वाद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे दिले.

येथील जुन्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारक भवनाजवळील दादांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून जयंतरावांनी आज प्रांजळपणे गतइतिहासात डोकावताना आज जयंतरावांनी आपल्या बोलण्यात कोठेही खोच राहणार नाही याची दक्षता घेतली.

एरवी नेहमीच जयंतरावांना संशयाच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या गर्दीने त्यांना आज टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याआधी विशाल यांनी मी चुकलोय तुम्ही सांभाळून घ्या असा जाहीर माफीनामाच जाहीर व्यासपीठासमोर सादर केला. 

गेले काही दिवस विशाल पाटील यांनी कॉंग्रेस-स्वाभीमानीतील उमेदवारी नाट्यावरून जयंतरावांना झारीतील शुक्राचार्य अशा शब्दात जयंतरावांना लक्ष्य केले होते. काल विशाल यांनी राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन गैरसमजातून मी तसे बोललो असे सांगत चार पाऊले मागे घेतली होती. आजच्या प्रचारसभेतही त्यांनी व्यासपाठावरील सर्वांनाच मी चुकीचे बोललो असे सांगत माफी मागितली. विशाल यांच्या माफीनाम्याच्या रोखाने बोलताना जयंतरावांनी मात्र आज सबुरीचा सूर लावताना म्हणाले, विशाल मला परवा भेटायला आले. मी लढतोय असे म्हणाले. मी त्यांना जिंकण्यासाठी लढ असा सल्ला दिला. मी आज इथे जाहीर करतो की मी तुमच्या पाठीशी पुर्ण ताकदीने आहे. आमच्यातील काही वाद असतील तर ते आता संपले आहेत. ते वाद मी प्रतीक, विशाल,शैलजाभाभी, जयश्रीताई एकत्र बसून संपवतो. त्याची तुम्हा कार्यकर्त्यांनी फिकीर करायची गरज नाही. तुम्ही कामाला लागा.'' 

ते म्हणाले,"" बापू-दादा वाद हा आता विषय राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनीही हा विषय डोक्‍यातून काढून टाकावा. इथे देशाच्या भवितव्याचा प्रश्‍न आहे. "काकांची काकागिरी निवडणुकीनंतर बघू, मी वसंतदादांसोबतही काम केले आहे. मी कधी त्यांना भेटायला गेलो तर बापूंचा मुलगा म्हणून कधी दालनाबाहेर बसवून ठेवले नाही. मला सन्मानाने आत बोलवले. माझे विष्णूअण्णांशी जिव्हाळ्याचे सबंध होते. मागे वळून राजकारण करायचे नसते. तो मागेच राहतो. पुढे बघून जातोय त्याच्याकडेच दिशा असते. 40 वर्षापूर्वीचे वाद आता काढू नका. आता विशाल तुम्ही जिंकण्यासाठी लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.''

Web Title: Jayant Patil comment