इस्लामपुरात रेकॉर्डब्रेक गर्दी; जयंत पाटील यांचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज इस्लामपुरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली. न भूतो न भविष्यती असे इस्लामपुरात शक्तीप्रदर्शन करून राष्ट्रवादी पुन्हा असा नारा दिला. आजच्या गर्दीने जयंत पाटील यांनी आपली लोकप्रियता दाखवून दिली.

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी  इस्लामपुरात कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली हाेती.

एकीकडे राज्यात राष्ट्रवादीला गळती लागत असताना दुसरीकडे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वाळवा-इस्लामपूर मतदार संघातून जयंत पाटील सातव्यांदा रिंगणात उतरले आहेत. यावेळी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील यांच्या समर्थकांनी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. आम्ही साहेबांसोबत म्हणत हजारो कार्यकर्ते जयंत पाटलांसाठी इस्लामपुरात एकवटले होते.
यावेळी हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इस्लामपुरात आले होते. यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधून आपली उमेदवारी दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil filed a form in Islampur