अन् जयंत पाटलांना भेटला 'बालमित्र'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सांगली : परगावात आपला गाववाला भेटला तर मोठा आंनद होतो. मग तो लहान असो की मोठा.. त्याच्याबद्दल आपल्याला एक ममत्व निर्माण होते. असाच प्रकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत घडला. तुरची (ता. तासगाव) येथील आश्रमशाळेत त्यांना "आपला गाववाला' अर्थात इस्लामपुरचा चिमुरडा भेटताच त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी लगोलग त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि मीही इस्लामपुराचाच असल्याचे सांगण्याचा मोह त्यांना आवरला नाही. शिवाय या बालकाला भेटून आपल्याला "बालमित्र' भेटल्याचा आनंद झाल्याचीही स्वाभाविक प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून उमटली. 

झालं असं की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तासगाव तालुक्‍याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तासगावातील तुरची या गावातील आश्रमशाळेला भेट दिली. त्यांचा स्वभावच गप्पिष्ट आहे. त्यामुळे त्यांनी भोवताली जमलेल्या बालचमूंशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा मारण्यात ते अगदी हरवून गेले. त्या मुलांमधीलच एक होत जयंत पाटील यांनी प्रत्येकाची ओळख करुन घेतली. त्यांचं नाव-गाव विचारलं, आवड-निवड विचारली. 

यावेळी नावं विचारत असातना, एका मुलाने त्याच्या गावाचं नाव "इस्लामपूर' असं सांगितलं. मग काय जयंत पाटील यांचे डोळे चमकले आणि क्षणाचा विलंब न करता त्यांनी हात पुढे करत त्याच्याशी हस्तांदोलन केलं. शिवाय मीही इस्लामपुरचाच असल्याचे सांगितले. त्यामुळे तो मुलगाही आनंदला. आश्रमशाळेत आपल्या गावातील मुलगा भेटल्यावर आनंद व्यक्त करताना जयंत पाटील यांनी आपल्याला बालमित्रच भेटावा इतका आनंद झाला आणि माझे हात त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास सरसावले. त्या दोन हातांतून मला प्रचंड ऊर्जा मिळाली, असे ते म्हणाले.

Web Title: Jayant patil meets Students